Jump to content

पुरावनस्पतीशास्त्र

प्राचीन काळातील वनस्पतींचा खडकातील अवशेषाद्वारे अभ्यास करणे म्हणजे पुरावनस्पतीशास्त्र (Palaeobotany) होय.

खडकांचे प्रामुख्याने ३ प्रकार आहेत: अग्नीजन्य खडक, गाळाचे खडक, व रूपातंरीत खडक. यापैकी फक्त गाळाच्या खडकांमध्ये जिवाश्म आढळते. ज्याप्रमाणे मानवी इतिहास हा पुस्तकांद्वारे दिसून येतो, त्याचप्रमाणे सजीवांचा इतिहास हा जीवाश्म द्वारे दिसतो. पृथ्वीवरील वातावरणीय बदल, हे समजण्यासाठी जीवाश्मांचा अभ्यास हा उपयोगी ठरू शकतो. जीवाश्म इंधनाचे चांगले स्‍त्रोत होऊ शकतात. दगडी कोळसा पेट्रोलीयम तसेच नैसर्गिक वायू हे जीवाश्म इंधन म्हणून ओळखले जातात. जीवाश्मद्वारे त्या काळातील वातावरण, भौगोलिक परिस्थिती, तापमान ,सजीवांमधील बदल अशा अनेक घटकांचा अभ्यास करता येतो.

"जिंको" या वनस्पतीला पुरावनस्पतिशास्त्रात अत्यंत महत्त्व आहे कारण ही वनस्पती सध्या अस्तित्वात असून याचे जीवाश्म यामध्येसुद्धा अस्तित्व दिसते. अशांना जिवंत जीवाश्म म्हणजेच Living fosssil असे म्हणतात.

भारतात ह्या विषयाचा अभ्यास व संशोधन प्रामुख्याने:

  • बिरबल सहानी इन्स्टीट्युट ऑफ पॅलिओबॉटनी,, लखनौ
  • वाडिया इन्स्टीट्युट ऑफ हिमालयीन जिओलॉजी देहराडून
  • आघारकर रिसर्च इन्स्टीट्युट, पुणे
  • डेक्कन कॉलेज,पुणे
  • ऑईल ॲण्ड नॅचरल गॅस कमिशन (ONGC)
  • शासकिय महाविद्यालय नागपूर

या ठिकाणी संशोधनास प्रोत्साहन दिले जाते. पुरावनस्पती शास्त्राच्या अभ्यासामुळे प्राचीन काळातील वातावरण सजीवांमधील गुणधर्म यांचा अभ्यास सहज करता येतो