पुनीत बालन
पुनीत बालन | |
---|---|
निवासस्थान | पुणे |
राष्ट्रीयत्व | भारतीय |
नागरिकत्व | भारतीय |
पेशा | उद्योजक, क्रिकेट खेळाडू, चित्रपट निर्माते व सामाजिक कार्यकर्ते. |
संकेतस्थळ www |
पुनीत बालन हे भारतीय उद्योजक, चित्रपट निर्माते [१] [२], क्रिकेट खेळाडू[३] व सामाजिक कार्यकर्ते [४] आहेत. ऑटोमोबाईल, रिअल इस्टेट, माहिती तंत्रज्ञान क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी करणारे प्रसिद्ध उद्योजक एस. बालन यांचे ते सुपुत्र आहेत. [५] श्रीमंत भाऊसाहेब रंगारी गणपतीचे ते विश्वस्त तसेच उत्सवप्रमुख आहेत. [६] [७] पुणे जगवर्स (टेनिस), [८] मुंबई खिलाडीज (खो खो), [९] महाराष्ट्र आयर्न मॅन (हॅन्डबॉल), [१०] प्रीमिअर बॅडमिंटन, टेबल टेनिस असे विविध क्रीडा प्रकारातील संघाचे ते मालक आहेत. काश्मीरी विद्यार्थ्यांना ज्ञानदान करण्यासाठी त्यांनी भारतीय लष्कराकडून चालविण्यात येत असलेल्या दहा शाळा भारतीय लष्करासोबत चालविन्यास घेतल्या असून या सर्व शाळा बारामुल्ला, कुपवाडा, अनंतनाग, पेहलगाम, पुलवामा, शोपियान, उरी, त्रेगम, व्हेन, घुरेस या भागात या सर्व शाळा आहेत. बारामुल्ला येथील विशेष मुलांसाठी असलेल्या डगर स्कुलला देखील भारतीय लष्करासोबत ते चालवत आहेत. [११] काश्मीर मध्ये केलेल्या समाजकार्याबद्दल पुनीत बालन यांना भारतीय लष्कराकडून गौरवण्यात आले. [१२]
एकशे पन्नास फूट उंच तिरंगा
पुनीत बालन यांनी शोफियान येथे चिनार कॉर्पस भारतीय लष्कराच्या साहाय्याने जम्मू काश्मीर मधील सर्वात उंच एकशे पन्नास फूट उंच तिरंगा उभारला. [१३]
चित्रपट निर्मिती
मुळशी पॅटर्न या चित्रपटाची निर्मिती पुनीत बालन यांनी केली असून, बॉलीवूडचे अभिनेते सलमान खान [१४] यांनी या चित्रपटाची हिंदी मद्धे 'अंतिम' या नावानी निर्मिती केली. [१५] [१६] [१७] [१८] [१९] रितेश देशमुख आणि जेनेलिया देशमुख यांना घेऊन महेश लिमये दिग्दर्शित आशेची रोषणाई या लघुपटाची निर्मिती केली. [२०] काश्मीर मद्धे हिंदूंची सद्य परिस्थिती सांगणारा शरद मल्होत्रा अभिनित 'द हिंदू बॉय' या लघुपटाची त्यांनी निर्मिती केली. भारतीय लष्करासोबत पुनीत बालन यांनी 'गुड शॉट' लघुपटाची निर्मिती केली. [२१] काश्मीर भागातील कलावंतांना घेऊन पुनीत बालन यांनी भारतीय लष्करासोबत 'अमन का आशियाना' या गीताची तसेच नातेसंबंधावर भाष्य करणारा 'जग्गू आणि ज्युलिएट' या चित्रपटाची त्यांनी निर्मिती केली. [२२] [२३]
इंद्राणी बालन फाउंडेशन
शहीद जवानांच्या कुटुंबियांना आर्थिक मदत [२४], ग्रामीण भागातील निराधार, गरीब विद्यार्थ्यांना दत्तक घेऊन त्यांना सायकल, संगणक, दप्तर पुरवून भावी पिढीला ताकद देण्याचे काम इंद्राणी बालन फाउंडेशन तर्फे केले जाते. पुनीत बालन इंद्राणी बालन फाउंडेशनचे अध्यक्ष्य आहेत. इंद्राणी बालन फाउंडेशन तर्फे श्रीमंत भाऊसाहेब रंगारी भवन या क्रांतिकारी इतिहास असलेल्या ऐतिहासिक वास्तूचे नूतनीकरण केले. [२५]
श्रीमती इंद्राणी बालन सायन्स अॅक्टिव्हिटी सेंटर
आर्थिकदृष्टय़ा दुर्बल घटकातील शालेय विद्यार्थ्यांना तसेच शिक्षकांनाही विज्ञान या विषयात गोडी निर्माण व्हावी यासाठी पुनीत बालन यांनी ‘आयसर’च्या परिसरात ४० हजार चौरस फुटांच्या जागेत 'श्रीमती इंद्राणी बालन सायन्स अॅक्टिव्हिटी सेंटर' या प्रयोगशाळा बांधली, [२६] या केंद्रात विज्ञानातील प्रयोगांच्या सादरीकरणासह व्याख्याने, विज्ञान प्रदर्शने असे उपक्रम राबवले जातात. [२७]
ऑनलाईन सांस्कृतिक महोत्सव
कोरोनाच्या पार्श्वभूमीवर गणेशउत्सवाची परंपरा खंडित होऊ नये म्हणून श्रीमंत भाऊसाहेब रंगारी गणपती ट्रस्टचे उत्सवप्रमुख पुनीत बालन यांनी ऑनलाईन सांस्कृतिक महोत्सव २०२० ही संकल्पना प्रथमच प्रत्यक्षात आणली, शंकर महादेवन, जावेद अली, राकेश चौरसिया, पंडित विजय घाटे, चारुदत्त अफळे, आनंदी जोशी, हृषीकेश रानडे, प्रियांका बर्वे, अजय अतुल, प्रवीण तरडे, नंदेश उमप, मृणाल कुलकर्णी, भार्गवी चिरमुले, श्रुती मराठे, मुग्धा वैशंपायन, कार्तिकी गायकवाड, प्रथमेश लघाटे असे अनेक नामवंत कलाकार यात सहभागी झाले, तसेच कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी पुनीत बालन यांच्यातर्फे भाविकांना ऑनलाइन दर्शन सुविधा उपलब्ध करण्यात आली. [२८] [२९] [३०] [३१]
संदर्भ
- ^ "Punit Balan Entertainment Private Limited Information - Punit Balan Entertainment Private Limited Company Profile, Punit Balan Entertainment Private Limited News on The Economic Times". The Economic Times. 2019-05-08 रोजी मूळ पान पासून संग्रहित. 2019-12-19 रोजी पाहिले.
- ^ "Producer Punit Balan is excited as his movie 'Mulshi Pattern' getting Bollywood remake". The Asian Age. 2019-12-19 रोजी पाहिले.
- ^ admin. "Cobras announce Associate Sponsor S Balan Group – Cape Cobras" (इंग्रजी भाषेत). 2019-12-19 रोजी मूळ पान पासून संग्रहित. 2019-12-19 रोजी पाहिले.
- ^ "एन्काउंटरप्रकरणातील पोलिसांना ब्रेव मेन पुरस्कार देणार | eSakal". www.esakal.com. 2019-12-19 रोजी पाहिले.
- ^ "उद्योजक एस. बालन यांना श्रद्धांजली" Check
|दुवा=
value (सहाय्य). https. 2019-12-19 रोजी पाहिले.[permanent dead link] - ^ "गणेशोत्सव मंडळ कार्यकर्ते भिडणार 'फ्रेन्डशिप टी २० कप' साठी - Maharashtra Vishva News". Dailyhunt (इंग्रजी भाषेत). 2019-12-19 रोजी पाहिले.
- ^ "गणेशोत्सव मंडळ कार्यकर्ते भिडणार 'फ्रेन्डशिप टी २० कप' साठी - Maharashtra Vishva News". Dailyhunt (इंग्रजी भाषेत). 2019-12-19 रोजी पाहिले.
- ^ "Tennis Premier League serves its fourth season in Pune". punemirror.com (इंग्रजी भाषेत). 2022-12-08. 2022-12-16 रोजी पाहिले.
- ^ "Mumbai Khiladis launch official jersey and announce Captain for the inaugural edition of Ultimate Kho Kho". The Week (इंग्रजी भाषेत). 2022-12-16 रोजी पाहिले.
- ^ Katoch, Bikash Chand (2022-01-18). "Premier Handball League unveils Maharashtra Ironmen as its fourth franchise". thebridge.in (इंग्रजी भाषेत). 2022-12-16 रोजी पाहिले.
- ^ "Indian Army signs MoU With Punit Balan's Indrani Balan foundation for financial sustainability of army goodwill schools of Kashmir". Zee News (इंग्रजी भाषेत). 2022-12-16 रोजी पाहिले.
- ^ वृत्तसेवा, प्रभात (2022-11-28). "युवा उद्योजक पुनीत बालन यांचा भारतीय सैन्य दलाकडून विशेष गौरव". Dainik Prabhat (इंग्रजी भाषेत). 2022-12-16 रोजी पाहिले.
- ^ "Chinar corps, Punit Balan grp instal national flag at Shopian". punemirror.com (इंग्रजी भाषेत). 2022-02-03. 2022-12-16 रोजी पाहिले.
- ^ "Salman Khan to make Hindi remake of Punit Balan's Marathi movie 'Mulshi Pattern'Photos - Marathi-Movies-The Times of India Photogallery". photogallery.indiatimes.com. 2019-12-19 रोजी मूळ पान पासून संग्रहित. 2019-12-19 रोजी पाहिले.
- ^ "Hindi Remake Of Punit Balan's Marathi Movie 'Mulshi Pattern' On The Cards". News18. 2019-12-19 रोजी पाहिले.
- ^ "Producer Punit Balan is excited as his movie 'Mulshi Pattern' getting Bollywood remake - Asian Age". Dailyhunt (इंग्रजी भाषेत). 2019-12-19 रोजी पाहिले.
- ^ "Hindi Remake Of Punit Balan's Marathi Movie 'Mulshi Pattern' On The Cards". in.style.yahoo.com (इंग्रजी भाषेत). 2019-12-19 रोजी पाहिले.
- ^ Desk, IBT Entertainment. "Producer Punit Balan excited as Salman Khan to remake his movie Mulshi Pattern in Bollywood". International Business Times, India Edition (english भाषेत). 2019-12-19 रोजी पाहिले.CS1 maint: unrecognized language (link)
- ^ Staff, Scroll. "'Antim: The Final Truth' trailer: Salman Khan in 'Mulshi Pattern' remake". Scroll.in (इंग्रजी भाषेत). 2022-12-16 रोजी पाहिले.
- ^ author/online-lokmat (2020-11-05). "रितेश आणि जेनेलियाचे फॅन्ससाठी दिवाळी गिफ्ट, 'आशेची रोषणाई'मधून ही जोडी आली भेटीला". Lokmat. 2022-12-16 रोजी पाहिले.
- ^ "पुनीत बालन स्टूडियोज की पहली शॉर्ट फिल्म 'गुड शॉट' लॉन्च". News18 हिंदी (हिंदी भाषेत). 2021-12-21. 2022-12-16 रोजी पाहिले.
- ^ "Aman ka Ashiyan: पुनीत बालन का नया म्यूजिक एल्बम, युवाओं के बीच छेड़ रहा देशभक्ति का तराना". Dainik Jagran (हिंदी भाषेत). 2022-12-16 रोजी पाहिले.
- ^ "Jaggu Ani Juliet Movie Review : A feel-good love story". ISSN 0971-8257.
- ^ "हुतात्मा जवानांच्या कुटुंबीयांना दोन लाखांची मदत | eSakal". www.esakal.com. 2019-12-19 रोजी पाहिले.
- ^ "श्रीमंत भाऊसाहेब रंगारी भवनातून क्रांतिकारकांची कामगिरी नव्या पिढीला कळेल- अभिताभ गुप्ता". पुढारी. 2022-08-17. 2022-12-16 रोजी पाहिले.
- ^ "गरजू विद्यार्थ्यांच्या शिष्यवृत्तीसाठी 'इन्फोसिस'तर्फे 'आयसर'ला ५ कोटींचा निधी". Loksatta. 2019-12-19 रोजी पाहिले.
- ^ "सावली झाली पायांखाली गडप (व्हिडिओ) | eSakal". www.esakal.com. 2019-12-19 रोजी पाहिले.
- ^ "पुणेकरांनो, यंदा श्रीमंत भाऊसाहेब रंगारी गणपतीचे प्रत्यक्ष दर्शन नाही! | eSakal". www.esakal.com. 2020-08-12 रोजी पाहिले.
- ^ samruddhi (2020-08-12). "श्रीमंत भाऊसाहेब रंगारी गणपती संस्थेचा ऑनलाईन सांस्कृतिक महोत्सव". Kesari (इंग्रजी भाषेत). 2020-08-12 रोजी पाहिले.[permanent dead link]
- ^ author/online-lokmat (2020-08-11). "सांस्कृतिक महोत्सवासह 'श्रीं'च्या दर्शनाचा ऑनलाईन लाभ ;श्रीमंत भाऊसाहेब रंगारी गणपती ट्रस्टचा निर्णय". Lokmat. 2020-08-12 रोजी पाहिले.
- ^ "पुनीत बालन ने श्रीमंत भाऊसाहेब रंगारी गणपति के सांस्कृतिक कार्यक्रम की करी घोषणा | Punit balan announces cultural program of Shrimant Rangari Ganpati". Patrika News (हिंदी भाषेत). 2021-09-09. 2022-12-16 रोजी पाहिले.