Jump to content

पुतळाबाई भोसले


महाराणी पुतळाबाई भोसले
महाराणी
मराठा साम्राज्य
अधिकारकाळ१६७४ - १६८०
राजधानीरायगड
पूर्ण नावपुतळाबाई शिवाजीराजे भोसले
पदव्यामहाराणी
मृत्यू२७ जून १६८०
रायगड किल्ला, महाराष्ट्र
पूर्वाधिकारीमहाराणी सोयराबाई
उत्तराधिकारीमहाराणी येसूबाई
पतीछत्रपती शिवाजी महाराज
राजघराणेभोसले
चलनहोन

पुतळाबाई भोसले ह्या छत्रपती शिवाजी महाराजांच्या पत्नी होत्या. पुतळाबाईंचा १५ एप्रिल १६५३ रोजी शिवाजी राजांंशी विवाह झाला. पुतळाबाई पालकर घराण्यातील होत्या. नेताजी पालकर हे पुतळाबाईंचे चुलते होते. त्यांना मूल बाळ नव्हते.

महाराणी पुतळाबाई या एक प्रचंड निष्ठावंत राणीसाहेब होत्या. श्रीमंत पुतळाबाई राणीसाहेब यांचे महाराजांच्यावर खूप खूप मनापासून अतिशय अफाट प्रेम होते. राजे पंचतत्वात विलीन झाल्यानंतर पुतळाबाई राणीसाहेब यांनी छत्रपती शिवाजी महाराजांचे जोडे ( पादुका/ व्हान/चप्पल) उराशी/छातीशी कवटाळून महाराजांच्या चितेत प्रवेश केला आणि त्या मराठा इतिहासात सौभाग्यवती सती गेल्या. (संदर्भ श्रीमान योगी लेखन श्री रणजीत देसाई)

महाराजांच्यानंतर स्वराज्याच्या जडणघडणीत त्यांनी मोठे योगदान दिले. महाराजांच्या इच्छेप्रमाणे संभाजी राजांकडे त्यांनी स्वराज्याचा कारभार सुखरूप सोपवला. त्यांचा मृत्यू रायगडावर झाला.