पुणे सार्वजनिक सभा
पुणे सार्वजनिक सभा - सरकार आणि प्रजा यांच्यातील प्रश्न पत्रव्यवहार, वाटाघाटी इत्यादी मार्गांनी सोडविण्यासाठी एखादी औपचारिक सार्वजनिक सभा स्थापन करणे या हेतूने प्रस्तुत सभेचे आयोजन २ एप्रिल १८७० रोजी करण्यात आले होते.[१] पुण्यातील ९५ प्रतिष्ठित नागरिक या सभेचे सभासद झाले. प्रत्येक सभासद हा ५० लोकांचा प्रतिनिधी होता. सभेचा हेतू विशद केल्यानंतर 'पुणे सार्वजनिक सभा' ही संस्था स्थापन झाल्याची घोषणा करण्यात आली. या पहिल्या सभेत सभेचे जे अधिकार मंडळ नेमण्यात आले ते पुढीलप्रमाणे होते.
अध्यक्ष: श्रीमंत श्रीनिवास पंत प्रतिनिधी (औंध संस्थान)
उपाध्यक्ष: श्रीमंत चिमणाजी रघुनाथ पंतसचिव (भोर), श्रीमंत रामचंद्र अप्पासाहेब जमखिंडीकर, श्री. निळकंठ माधवराव पुरंदरे, श्रीमंत धुंडीराज चिंतामण पटवर्धन सांगलीकर, श्रीमंत विनायक अप्पासाहेब कुरुंदवाडकर, श्रीमंत माधवराव बल्लाळ फडणीस मेणवलीकर
पुणे सार्वजनिक सभेचे अध्यक्षपद भूषविलेल्या मान्यवरांत लोकमान्य बाळ गंगाधर टिळक, लोकहितवादी गोपाळ हरी देशमुख, महर्षी अण्णासाहेब पटवर्धन, ल. ब. भोपटकर, कृष्णाजी लक्ष्मण नूलकर, दा. वि. गोखले, विष्णू मोरेश्वर भिडे, गणपतराव नलावडे, र. बा. फडके, पोपटलाल शहा, ॲड. पुरुषोत्तम डावरे, पुरुषोत्तम गणेश मोडक, अरिवद आळेकर ह्यांचा समावेश आहे.[१]
१८९० मध्ये गोपाळ कृष्ण गोखले हे पुणे सार्वजनिक सभेचे चिटणीस झाले.[२]
संदर्भ
- ^ a b "'पुणे सार्वजनिक सभे'चे अध्यक्षपद प्रथमच महिलेकडे". लोकसत्ता. २९ मार्च २०१६. ६ ऑगस्ट २०१८ रोजी पाहिले.
- ^ "गोखले, गोपाळ कृष्ण". २८ एप्रिल २०२१ रोजी पाहिले.
२. पुणे सार्वजनिक सभा MPSC PDF Notes Archived 2020-10-21 at the Wayback Machine.
संदर्भ सूची
- सार्वजनिक काका - म.श्री.दीक्षित
- वासुकाका व त्यांचा काल - त्र्यं. देवगिरीकर