Jump to content

पुणे छावणी विधानसभा मतदारसंघ

पुणे कॅन्टोन्मेंट विधानसभा मतदारसंघ - २१४ (Pune Cantonment Vidhan Sabha constituency) हा महाराष्ट्र राज्य विधानसभेच्या २८८ मतदारसंघांपैकी एक आहे. हा पुणे जिल्ह्यातील मतदारसंघ आहे. लोकसभा आणि विधानसभा मतदारसंघ परिसीमन आदेश, २००८ नुसार केलेल्या मतदारसंघांच्या रचनेनुसार, पुणे कॅन्टोन्मेंट मतदारसंघात पुणे महानगरपालिकेच्या वॉर्ड क्र. १६, १८, २४ ते २५, ६९ ते ७५, ७७, ७९ ते ८०, ८३ ते ८५, १०२, १०४ आणि पुणे कंटोनमेंटचा समावेश होतो. पुणे कॅन्टोन्मेंट हा विधानसभा मतदारसंघ पुणे लोकसभा मतदारसंघात मोडतो आणि हा मतदारसंघ अनुसूचित जाती - SC च्या उमेदवारांसाठी राखीव आहे.[][]

भारतीय जनता पक्षाचे सुनिल ज्ञानदेव कांबळे हे पुणे कॅन्टोन्मेंट विधानसभा मतदारसंघाचे विद्यमान आमदार आहेत.[]

पुणे कॅन्टोन्मेंट मतदारसंघातून निवडून आलेले आमदार

वर्ष आमदार[]पक्ष
२०१९सुनील कांबळेभारतीय जनता पक्ष
२०१४दिलीप कांबळे भारतीय जनता पक्ष
२००९रमेश आनंदराव बागवे भारतीय राष्ट्रीय काँग्रेस

निवडणूक निकाल

संदर्भ

  1. ^ "भारत परिसीमन आयोग यांची अधिसूचना" (PDF). 2009-02-19 रोजी मूळ पानापासून संग्रहित (PDF). १२ October २००९ रोजी पाहिले.
  2. ^ "Delimitation of Parliamentary & Assembly Constituencies Order - 2008".
  3. ^ "१४ वी महाराष्ट्र विधानसभा २०१९ सदस्यांचा संक्षिप्त जीवन परिचय" (PDF).
  4. ^ "STATISTICAL REPORTS OF GENERAL ELECTION TO STATE LEGISLATIVE ASSEMBLY (VIDHANSABHA)".

बाह्य दुवे