Jump to content

पुएर्तो लेम्पिरा

पुएर्तो लेम्पिरा होन्डुरासच्या ग्रासियास आ दियोस प्रांतातील मोठे शहर आणि तेथील राजधानी आहे. हे शहर कारातास्का लगूनच्या काठावर वसलेले आहे. या शहरात पक्के रस्ते अभावानेच असले तरीही हे ग्रासियास आ दियोसमधील सगळ्यात मोठे शहर आहे. २०१५ च्या अंदाजानुसार येथील लोकसंख्या ५०,२६८ होती.

या शहरास १६व्या शतकातील लेंका जमातीतील नेत्याचे नाव देण्यात आले आहे. लेम्पिराने १५३० च्या दशकात स्पॅनिश घुसखोरांविरुद्ध असफल बंड पुकारले होते. १९७५ साली ग्रासियास आ दियोसची राजधानी ब्रुस लगुना येथून पुएर्तो लेम्पिरा येथे हलविण्यात आली. १९८० च्या सुमारास सॅंडिनिस्टा क्रांतिकाऱ्यांविरुद्ध लढण्यासाठी सी.आय.ए.ने येथे तळ ठोकला होता.