Jump to content

पी.आर. थिलागम

पी. आर. थिलागम (जन्म 1926)किंवा थिरुवरुर थिलागम, ह्या भारतीय संगीतकार आणि गायिका आहेत. तसेच त्या कुरावंजी(जे भारताच्या तामिळनाडू राज्यात लोकप्रिय असलेल्या नृत्य नाटकाचा एक पारंपारिक प्रकार आहे.)च्या प्रवर्तिका म्हणून ज्ञात आहेत. [] [] त्या इसाई वेल्लालार समुदायाच्याकोंडी परंपरेतील (कोंडी वारसा) आहेत. हा समुदाय त्यागराज मंदिर, तिरुवरूर येथे पूजा करण्यासाठी समर्पित महिलांचा पंथ आहे. []

थिलागम यांचा जन्म 1926 मध्ये तामिळनाडूमधील तिरुवरूर येथे त्यागराज मंदिरासाठी माहीत असलेल्या कोंडी देवदासींपैकी शेवटच्या नर्तकांच्या कुटुंबात झाला. [] त्यांच्या आजी, कमलांबल ह्या नृत्य नाटकातील उल्लेखनीय कलाकार होत्या. त्यांच्याकडून कुरावंजी शिकून त्यांनी सार्वजनिक कार्यक्रम सुरू केले[] आणि भारत व परदेशात अनेक ठिकाणी सादरीकरण केले. [] त्यांना 1997 चा संगीत नाटक अकादमी पुरस्कार मिळाला आहे. [] [] भारत सरकारने त्यांना 2007 मध्ये कलेतील योगदानाबद्दल पद्मश्री हा चौथा सर्वोच्च नागरी सन्मान प्रदान केला. [] त्यांच्या कामगिरीचे इंदिरा गांधी नॅशनल सेंटर फॉर द आर्ट्स (IGNCA) द्वारे व्हिडिओ-दस्तऐवजीकरण केले गेले आहे. [] तर त्यांची जीवनकथा मद्रास सीझन: इट्स जेनेसिस या नियतकालिकाचे मुख्य वैशिष्ट्य आहे. ते नियतकालिक श्रुती(एक परफॉर्मिंग आर्ट्ससाठी समर्पित मासिक)ने प्रकाशित केले आहे. [१०]

हे सुद्धा पहा

  • इंदिरा गांधी नॅशनल सेंटर फॉर द आर्ट्स
चित्र:TheatreIndia दालन

संदर्भ

  1. ^ Ananda Lal, ed. (2004). The Oxford Companion to Indian Theatre. Oxford University Press. ISBN 9780195644463.
  2. ^ Saṅgīt Mahābhāratī (2011). The Oxford Encyclopaedia of the Music of India. Oxford University Press. ISBN 9780195650983.
  3. ^ Davesh Soneji (2012). Unfinished Gestures: Devadasis, Memory, and Modernity in South India. University of Chicago Press. p. 313. ISBN 9780226768090.
  4. ^ "Padma Shri Awardees for Arts". Kutcheri Buzz. 28 January 2007. 18 January 2016 रोजी पाहिले.
  5. ^ a b "Major IGNCA Documentation". Indira Gandhi National Centre for the Arts. 2016. 17 September 2008 रोजी मूळ पान पासून संग्रहित. 18 January 2016 रोजी पाहिले.
  6. ^ "Kalakshetra Annual Art Festival" (PDF). Ragashankara. 2016. 18 January 2016 रोजी पाहिले.[permanent dead link]
  7. ^ "Overview in Oxford Index". Oxford University Press. 2016. 18 January 2016 रोजी पाहिले.
  8. ^ "SNA Awardees". Sangeet Natak Akademi. 2016. 30 May 2015 रोजी मूळ पान पासून संग्रहित. 18 January 2016 रोजी पाहिले.
  9. ^ "Padma Awards" (PDF). Ministry of Home Affairs, Government of India. 2016. 2015-10-15 रोजी मूळ पान (PDF) पासून संग्रहित. 3 January 2016 रोजी पाहिले.
  10. ^ "Madras Season: Its Genesis". Sruti. December 2005. 18 January 2016 रोजी पाहिले.

साचा:Padma Shri Award Recipients in Art