Jump to content

पिरकोन

  ?पिरकोन

महाराष्ट्र • भारत
—  गाव  —
प्रमाणवेळभाप्रवे (यूटीसी+५:३०)
जवळचे शहरउरण
जिल्हारायगड जिल्हा
भाषामराठी
सरपंच
बोलीभाषा
कोड
• आरटीओ कोड

• एमएच/

पिरकोन हे भारतातील महाराष्ट्र राज्यातील मध्य कोकणातील रायगड जिल्ह्यातील उरण तालुक्यातील एक गाव आहे.

भौगोलिक स्थान

पिरकोन हे महाराष्ट्राच्या रायगड जिल्ह्यातल्या उरण तालुक्याच्या पूर्व भागात वसलेले एक गाव आहे. उरणइतकीच आवरे(आवरा) आणि पिरकोन ही गावे पुरातन आहेत.

पिरकोन हे उरण ते खारपाडा या जिल्हामार्गावर येते. येथूनच आवरे आणि गोवठाणे गावांकडे जाण्यासाठी रस्ता फुटतो.

येथे रयत शिक्षण संस्थेचे शाळा , १२ पर्यंत महाविद्यालय आहे त्याच बरोबर डि.एड.महाविद्यालय आहे.

पिरकोन चा इतिहास :

वीरगळ’ हा शब्द आता ‘पिरकोन’ परिसरात अनेकांच्या तोंडी रुळला असावा. नवी मुंबई, मुंबई  पासून अवघ्या तासाभराच्या अंतरावरील या परिसरात वीरगळ आढळले आहेत, हे मागील लेखामुळे बहुतांश लोकांना ज्ञात झाले. आपल्या राज्यात बऱ्याचशा ठिकाणी असे विरगळ आहेत. आपल्याकडे आढळणारे वीरगळ हे मुख्यत्वे मराठवाडा,पुणे  पासून ते कोकण, रायगड पर्यंत पसरलेले आहेत. वीरगळांना ऐतिहासिक व शिल्पशास्त्रीय महत्त्व आहे. महाराष्ट्रात वीरगळांचे अनेक प्रकार आहेत. वीराच्या पराक्रमानुसार व पदानुसार दगडाच्या एकाच बाजूने तर कधी दोन्ही बाजूने किंवा चारी बाजूने चौकट करून वीराच्या युद्धप्रसंगाचे चित्र कोरले जाते. युद्ध प्रसंगात बरीच विविधता असते. पायदळ, घोडदळ स्वरूपातील युद्धप्रसंग आहेतच, पण हत्तीवरून आणि नौकेवरून झालेल्या लढायांचे प्रसंगही आढळतात. पारंपारिक युद्ध प्रसंगांसह आणखी काही वेगळ्या घटनांवरील वीरगळ असू शकतात. चोर लुटारूंपासून गाई गुरांचे रक्षण करताना मरण स्विकारलेला वीर किंवा रानटी प्राण्यांशी लढणारा वीर असेही काही प्रसंग आहेत.

    आपण पिरकोनमधील ज्या वीरगळीविषयी माहिती पाहणार आहोत, ती वीरगळ गावातील मारूती मंदिरासमोरील जागेत विराजमान आहे.



पिरकोन हत्याकांड;

१९८६ साली पिरकोन येथिल डि.एड. महाविद्यालय गावाच्या बाहेर पिरकोन गावाच्या उत्तर पुर्वेस नवे डि.एड महाविद्यालय निर्माण केले गेल्यामुळे डि.एड. महाविद्यालय गावाच्या बाहेर गेल्यामुळे दोन पक्षांत हा वाद निर्माण झाला , ह्यामध्ये गावातील काही लोकांना हा निर्णय मान्य नसल्याने त्यांनी मुंबई शहरातील तथाकथित भाडोत्री गुंड आणून त्यांच्या माध्यमातून गावात दहशत माजवण्यास सुरुवात केली ,या हल्ल्यात पहिल्यांदा पंचक्रोशीतील एसिड हल्ला झाला , खुप जण जखमी झाले, हा एसिड हल्ला ईतका भिषण होता कि काही जखमी इस्पितळातच मृत्यूमुखी पडले, दहशत माजवण्यासाठी आलेल्या भाडोत्री गुंडानी पिस्तूल रिव्हॉल्वरचा वापर केला, पिरकोन

हत्याकांडात झाले यात सुमारे ५ जणांच्या निघृण हत्या, खुद्द त्यावेळे मुख्याध्यापक दहशतीच्या सावटाखाली होते, त्यांनी स्वतः ची बदली करून घेतली.

   

   

हवामान

पावसाळ्यात येथे भरपूर प्रमाणात पाऊस पडतो आणि हवामान समशीतोष्ण राहते. हिवाळ्यात येथील हवामान थंड असते व अनेकदा सकाळी धुके पडते. उन्हाळ्यात हवामान उष्ण असते.

लोकजीवन

प्रेक्षणीय स्थळे

नागरी सुविधा

जवळपासची गावे

संदर्भ

  1. व्हिलेजइन्फो.इन
  2. सेन्सस२०११.को.इन
  3. टूरिझम.गव्ह.इन
  4. .https://www.incredibleindia.org/
  5. .https://www.india.gov.in/topics/travel-tourism
  6. मॅप्सऑफइंडिया.कॉम