पिप्पलाद
पिप्पलाद हे औपनिषदिक काळातील ऋषी आणि अथर्ववेदाच्या संकलकांपैकी एक होते. ते व्यास मुनिंच्या शिष्यपरंपरेतील देवदर्श नामक आचार्यांच्या शिष्यांपैकी एक होते. प्रश्नोपनिषदात व अन्य वैदिक, हिंदू पौराणिक वाङ्मयात त्यांचा उल्लेख आढळतो.
संदर्भ
- 'भारतवर्षीय प्राचीन चरित्रकोश (खंड १) - डॉ. सिद्धेश्वरशास्त्री चित्राव - 'भारतीय चरित्रकोश मंडळ, पुणे ४'