पिंडारी व काफनी हिमनदी
पिंडारी व काफनी ही भारताच्या उत्तरांचल या राज्यातील प्रसिद्ध हिमनद्यांची जोडी आहे. महाराष्ट्रातील अनेक ट्रेकिंगच्या संस्था येथे ट्रेक आयोजित करतात. त्यामुळे येथे महाराष्ट्रातून भेट देणाऱ्यांची संख्या पुष्कळ आहे. ह्या हिमनद्या नंदादेवी पर्वताच्या पायथ्याशी असलेल्या पर्वत रांगांमध्ये आहेत.
ट्रेक
वर नमूद केल्याप्रमाणे पिंडारी काफनीचा ट्रेक प्रसिद्ध आहे. हा ट्रेक हिमालयातील मध्यम श्रेणीचा ट्रेक आहे. मध्यम यासाठी की शेवटच्या टप्यात भ्रमंती १०,००० फुटावरील व धोकादायक हिमनद्यांवरून जात असल्याने थकावट होउ शकते. हा ट्रेक पुरेशी माहीती काढल्यास विना ट्रेकिंग क्लब पण पार पाडता येईल.
- पहिला दिवस- या साठी सर्वप्रथम अल्मोडा येथून बागेश्वर येथे यावे. बागेश्वरहून लोहारखेत येथे बस ने यावे.
- दिवस दुसरा- लोहारखेत येथे विश्रांती ( उंचीचा त्रास कमी होण्यासाठी येथे विश्रांती घेणे गरजेचे आहे)
- दिवस तिसरा- लोहारखेतहून पहिली वाटचाल सुरू होते. धाकुरी येथील खिंडीत पोहोचल्यावर हिमालयाचे अतिशय विलोभनीय दृश्य दिसते. धाकुरी येथून खाती येथे जायला संपूर्णपणे उतार आहे. खाती येथे मुक्काम
- दिवस चौथा -खाती पासून फुरकिया येथे पिंडार नदीच्या कडेकडेने वाटचाल फुरकिया येथे मुक्काम उंची १०,००० फुट
- दिवस पाचवा- फुरकिया येथून पिंडार नदीच्या उगमापाशी झिरो पॉइंट येथे पोहोचणे. हा ट्रेकमधील सर्वात रोमांचक भाग आहे. पिंडारवरून पुन्हा उतरून द्वाली या काफनी नदीच्या संगमापाशी मुक्काम
- दिवस सहावा- द्वाली येथून काफनी हिमनदीच्या खोऱ्यात ट्रेक. काफनी नदीच्या उगमापर्यंत हिमनद्यामधून वाटचाल (१३,२०० फूट). सायंकाळपर्यंत द्वाली येथे परत.
- दिवस सातवा - द्वाली वरून धाकुरी येथील खिंडीत चढणीच्या रस्त्यावर वाटचाल. धाकुरी खिंडीत मुक्काम
- दिवस आठवा- धाकुरी खिंडीतून लोहारखेत व तेथून पुन्हा बागेश्वर बसने.
वर नमूद केलेल्या सर्व जागांवर कुमाऊं विकास निगम मंडलने रहाण्यासाठी बंगल्यांची सोय केलेली आहे. कुमाऊं विकास निगम मंडलकडे रहाण्याच्या/खाण्याच्या व्यवस्थेबाबत आगाउ चौकशी व नोंदणी करावी. ट्रेकच्या रस्त्यांवर खाण्याची सोय होउ शकते.
बाह्य दुवे
- A trip report on the Pindari Glacier Trek Archived 2015-11-16 at the Wayback Machine.