पा-द-कॅले
पा-द-कॅले Pas-de-Calais | ||
फ्रान्सचा विभाग | ||
| ||
पा-द-कॅलेचे फ्रान्स देशामधील स्थान | ||
देश | फ्रान्स | |
प्रदेश | नोर-पा-द-कॅले | |
मुख्यालय | अॅरास (Arras) | |
क्षेत्रफळ | ६,६७१ चौ. किमी (२,५७६ चौ. मैल) | |
लोकसंख्या | १४,६१,२५७ | |
घनता | २१९ /चौ. किमी (५७० /चौ. मैल) | |
आय.एस.ओ. ३१६६-२ | FR-62 |
पा-द-कॅले (फ्रेंच: Pas-de-Calais) हा फ्रान्स देशाच्या नोर-पा-द-कॅले प्रदेशातील एक विभाग आहे. हा विभाग फ्रान्सच्या उत्तर भागात इंग्लिश खाडीवर वसला असून पा-द-कॅले हे डोव्हरच्या सामुद्रधुनीचे फ्रेंच भाषेमधील नाव आहे.
कॅले हे येथील शहर इंग्लंडच्या डोव्हर शहरासोबत चॅनल टनेलद्वारे जोडले गेले आहे व युरोस्टार ही रेल्वेकंपनी ह्या भुयारी मार्गामधून जलदगती रेल्वेसेवा चालवते.