पावशा
" | पावशा |
---|
प्रजातींची उपलब्धता |
" | शास्त्रीय वर्गीकरण |
इतर नावे |
ब्रेनफीव्हर बर्ड [१] |
पावशा किंवा पावश्या (इंग्रजी: Brainfever Bird or Common Hawk-Cuckoo), (शास्त्रीय नाव: Cuculus varius varius), आकाराने साधारण कबुतराएवढा असतो.पावशाचे नाते पावसाळ्याशी जोडले आहे. मान्सूनचा पाऊस येण्याआधी याच्या 'पाऊस आला', 'पाऊस आला' (किंवा 'पेरते व्हा', 'पेरते व्हा') अशा आवाजाने पावसाच्या आगमनाची सूचना मिळते असे. महाराष्ट्रातील लोक याला बळीराजा मानतात व शेतीच्या कामाला हा कामी येतो. हा पक्षी सामान्यांच्या जवळचा आहे. यावर अनेक भाषांमध्ये लोक-कथा, गीते, म्हणी वगैरे आहेत.
उत्तरी भारतीयांना याचा आवाज ’पी-पहा, पी-कहां’ असा ऐकू येतो. इंग्रजांना तो”हू बी यू, हू बी यू’ असातर काहींना ’ओह लॉर, ओह लॉर’ ’वी फील इट, वी फील इट’असा ऐकू येतो. तर काही फिरंग्यांना तो ब्रे..न फीव्हर, ब्रे..न फीव्हर’ असा वाटतो. यावरूनच या पक्षाला इंग्रजीत ब्रेनफीव्हर पक्षी म्हणतात. बंगाली लोकांना याचा आवाज ’चोख गेलो’ म्हणजे माझे डोळे गेले असा वाटतो.
या पावश्याचा आवाज चार ते सहा वेळा खालून वरच्या पट्टीत वाढत जातो व एक दोन मिनिटांच्या मध्यंतरानंतर परत सुरू होतो. ढगाळ वातावरणात आणि चांदणे पडलेल्या रात्रीत याचा आवाज बुलंद होत सतत चालू असतो, त्यामुळे अगदी गाढ झोपणाऱ्याचीही झोप उडते. मादीचा आवाज नरापेक्षा वेगळा आणि थोडा कर्कश असतो. .
नर-मादी दिसायला सारखेच, राखेच्या रंगाचे, शेपटीवर पट्टे असतात. भारतात सर्वत्र आढळतो, झुडपी जंगल आणि शेताच्या जवळपास राहणे पसंत करतो. विणीचा काळ मार्च ते जून असून कोकिळेप्रमाणेच पावश्याची मादी स्वतःचे अंडे दुसऱ्या पक्षांच्या घरट्यात गुपचूप टाकून निघून जाते. पुढे यांच्या पिलांना वाढवायची जबाबदारी अशा पालकांची असते.
भारतात ब्रिटिश राजवटीत राहणाऱ्या इंग्रजांनी या पक्ष्याला ‘ब्रेनफीव्हर बर्ड’ हे नाव दिले आणि ते रूढ झाले.[१]