Jump to content

पालोद

औरंगाबाद जिल्ह्याच्या सिल्लोड तालुक्यातील पालोद हे गाव स्व. सहकारमहर्षी मा. खासदार राज्यमंत्री माणिकराव पालोदकर यांची जन्मभूमी, कर्मभूमी आहे. हे गाव खेळणा नदी च्या काठावर बसले आहे. पालोद याच ठिकाणी या खेळणा नदीवर "खेळणा मध्यम प्रकल्प" हे धरण आहे. या धरणातून सिल्लोड शहरास तसेच आठ ते दहा गावांना पाणीपुरवठा केला जातो. गावची लोकसंख्या 8 ते 10 हजार एवढी आहे. गावात अंगणवाडी ते चौथीपर्यंत जिल्हा परिषद शाळा आहे आणि पाचवी ते बारावी पर्यंत राजर्षी शाहू शिक्षण संस्था संचलित "सहकार महर्षी माणिकराव पालोदकर माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालय पालोद" ही शाळा आहे. माध्यमिक उच्च माध्यमिक शिक्षणासाठी पंचक्रोशीतील हजारो विद्यार्थी या शाळेत येतात. गावात ग्रामपंचायात आहे,जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक आहे. प्राथमिक आरोग्य केंद्र(सरकारी दवाखाना घाटी) आहे. या रुग्णालयाचा लाभ हा पंचक्रोशीतील लोकांना होतो. तसेच पशुवैद्यकीय दवाखाना आहे,

मंगळवारी सरकारी दवाखान्याच्या बाजूला संध्याकाळी 4 वाजल्यापासून छोटा बाजार भरत असतो, गावातील व आजूबाजूच्या गावातील शेतकरी व व्यापारी येथे भाजीपाला व इतर दुकाने घेऊन येत असतात.

नागझरी संस्थान

गावापासून एक किलोमीटर अंतरावर खेळणा नदी तीरावर प्रसिद्ध असे नागझरी संस्थान आहे.

येथे महादेव मंदिर,विठ्ठल रुख्मिणी मंदिर तसेच गोमुख तीर्थ असल्या कारणाने भाविक येथे दर्शनासाठी येत असतात . सोमवारी व श्रावण महिन्यात भाविकांची येथे वर्दळ बघायला मिळते.

येथील गोमुख तिर्थाला वेगळे महत्व आहे , गोमुखाचे पाणी रात्री गरम व सकाळी थंड असते, या पाण्याने अंघोळ केल्यास अनेक त्वचारोज व इतर आजार बरे होतात अशी आख्यायिका आहे, श्रावण महिन्यात अनेक भाविक येथे अंघोळ करण्यासाठी येत असतात. आधी बाराही महिने गोमुखाला पाणी चालू राहायचे परंतु आता आता श्रावण महिन्यात गोमुखाला पाणी येते व उन्हाळ्यापर्यंत चालू राहते.

श्रावण महिन्यातील एका सोमवारी येथे संस्थान च्या वतीने भंडारा आयोजित केलेला असतो.

मेडिकल/दुकाने

साईसुख मेडिकल पालोद.

श्री गजानन मेडिकल पालोद.

अथर्व फार्मा मेडिकल पालोद.

महा ई सेवा केंद्र पालोद

शिवशक्ती किराणा स्टोर्स

जनता किराणा स्टोर्स

सिद्धार्थ किराणा स्टोर्स

जय गजानन इलेक्ट्रॉनिक्स

दीपराज किराणा स्टोर्स

अनिस इलेक्ट्रॉनिक रिपेरिंग & मोटार रीवायडिंग

विश्वकर्मा वेल्डिंग वर्कशॉप

विश्वरत्न शेती साहित्य

कृष्णा मेन्स पार्लर

पवन मेन्स पार्लर साई कोचिंग क्लासेस पालोद