Jump to content

पार्वतीबाई आठवले

पार्वतीबाई महादेव आठवले (जन्म : देवरूख, महाराष्ट्र, इ.स. १८७० – - १० ऑक्टोबर १९५५) या हिंगणे स्त्री शिक्षण संस्थेसाठी काम करणाऱ्या कार्यकर्त्या होत्या. त्यांचे माहेरचे नाव कृष्णा जोशी असून, वडिलांचे नाव बाळकृष्ण केशव जोशी होते. वयाच्या ११व्या वर्षी त्यांचे लग्न महादेव नारायण आठवले यांच्याशी झाले. थोड्याच वर्षांत त्या विधवा झाल्या. त्यानंतर त्या धोंडो केशव कर्वे यांच्या साहाय्यक झाल्या.[ संदर्भ हवा ]

वयाच्या ४२ वयापर्यंत पार्वतीबाई आठवले या तत्कालीन ब्राह्मण विधवांप्रमाणे केशवपन करवून घेऊन लाल आलवणे नेसत. त्यानंतरमात्र त्यांनी हे जुने रीतिरिवाज सोडून दिले. कर्व्यांच्या स्त्रीशिक्षण संस्थेसाठी देणग्या मिळवण्यास त्यांनी भारतभर आणि इंग्लंड-अमेरिकेतसुद्धा प्रवास केला.[ संदर्भ हवा ]

पार्वतीबाईंनी माझी कहाणी या नावाचे आत्मचरित्र लिहिले आहे. त्यातील भाषा साधी सरळ पण रोखठोक आहे. स्त्रीने आपले सौंदर्य टिकवून पतीस प्रसन्न ठेवले पाहिजे असे त्या कटाक्षाने नमूद करतात. तसेच केशवपन ही स्त्रियांवरील जुलूम जबरदस्ती आहे याची जाणीव होताच ही अमानुष प्रथा झिडकारून केस वाढवतात, त्यांची बंडखोर वृत्ती स्त्री स्वातंत्र्याचा मर्यादित पुरस्कार करते कारण त्यांच्या स्त्री स्वातंत्र्याच्या कल्पनेला मर्यादा आहेत. त्यांचा बालविवाहाला तसेच प्रेमविवाहालाही विरोध होता. त्यांच्या लेखनातून तत्कालीन कौटुंबिक समाजरचना लक्षात येते.[ संदर्भ हवा ]

संदर्भ