पार्क चुंग-ही
पार्क चुंग-ही | |
दक्षिण कोरियाचा तिसरा राष्ट्राध्यक्ष | |
कार्यकाळ २४ मार्च १९६२ – २६ ऑक्टोबर १९७९ | |
मागील | यून बॉ-सिऑन |
---|---|
पुढील | चॉय क्यु-हा |
जन्म | ३० सप्टेंबर १९१७ गुमी, जपानी कोरिया |
मृत्यू | २६ ऑक्टोबर, १९७९ (वय ६२) सोल, दक्षिण कोरिया |
धर्म | बौद्ध |
सही |
पार्क चुंग-ही (कोरियन: 박정희; ३ मार्च १९३० [काळ सुसंगतता?] - २६ ऑक्टोबर १९७९) हा पूर्व आशियामधील दक्षिण कोरिया देशाचा लष्करी अधिकारी व राष्ट्राध्यक्ष होता. १९६१ सालच्या लष्करी बंडादरम्यान त्याने दक्षिण कोरियाची सत्ता बळकावली. १९६३ मधील निवडणुकीत विजय मिळवुन तो अधिकृतपणे देशाचा राष्ट्राध्यक्ष बनला. त्यापुढील त्याच्या १६ वर्षांच्या कार्यकाळात चुंग-हीने युद्धात उध्वस्त झालेल्या दक्षिण कोरियाला प्रगतीपथावर नेले व देशाचे झपाट्याने उद्योगीकरण केले. परंतु त्याचबरोबर एका हुकुमशहाच्या थाटात सत्ता गाजवण्याच्या त्याच्या शैलीवरून त्याच्यावर मोठ्या प्रमाणावर टीका देखील झाली.
२६ ऑक्टोबर १९७९ रोजी चुंग-हीची त्याच्याच एका सुरक्षा अधिकाऱ्याने हत्या केली.
२५ फेब्रुवारी २०१३ रोजी चुंग-हीची मुलगी पार्क ग्युन-हे ही राष्ट्रीय अध्यक्षीय निवडणुकीत विजय मिळवून दक्षिण कोरियाची पहिली महिला राष्ट्राध्यक्ष बनली.
बाह्य दुवे
- व्यक्तिचित्र (जपानी)