पारो विमानतळ
पारो विमानतळ | |||
---|---|---|---|
आहसंवि: PBH – आप्रविको: VQPR PBH | |||
माहिती | |||
प्रचालक | नागरी उड्डाण विभाग | ||
कोण्या शहरास सेवा | थिम्फू | ||
हब | ड्रुक एर ताशी एर | ||
समुद्रसपाटीपासून उंची | ७,३३२ फू / २,२३५ मी | ||
गुणक (भौगोलिक) | 27°24′32″N 89°25′14″E / 27.40889°N 89.42056°E | ||
धावपट्टी | |||
दिशा | लांबी | पृष्ठभाग | |
मी | फू | ||
15/33 | 1,964 | 6,445 | डांबरी |
पारो विमानतळ (आहसंवि: PBH, आप्रविको: VQPR) हा भूतान देशामधील एकमेव आंतरराष्ट्रीय विमानतळ आहे. हा विमानतळ पारो जिल्ह्यामध्ये दुर्गम व डोंगराळ भागात स्थित आहे. हा विमानतळ एका दरीमध्ये असून त्याच्या चारी बाजूंनी उंच पर्वतरांगा आहेत. केवळ निष्णात व कुशल वैमानिकच येथे विमान उतरवू व उड्डांणे करू शकतात. केवळ दिवसाच हा विमानतळ चालू असतो.
हा विमानतळ भारताच्या सीमा रस्ते संघटनेने १९६८ साली बांधला. ड्रुक एर ह्या भूतानच्या राष्ट्रीय विमान वाहतूक कंपनीचा प्रमुख वाहतूकतळ येथेच आहे.
विमानकंपन्या व गंतव्यस्थाने
विमान कंपनी | गंतव्य स्थान . |
---|---|
ड्रुक एर | बागडोगरा, बँकॉक, दिल्ली, ढाका, गया, गुवाहाटी, काठमांडू, कोलकाता, मुंबई, सिंगापूर |
ताशी एर | बँकॉक, काठमांडू, कोलकाता[१] |
संदर्भ
- ^ JL (17 August 2013). "Bhutan Airways to Start Kolkata / Bangkok Service from October 2013; Airline Route – Worldwide Airline Route Updates". Airlineroute.net. 5 October 2013 रोजी पाहिले.
बाह्य दुवे
विकिमीडिया कॉमन्सवर संबंधित संचिका आहेत