Jump to content

पारगाव (पालघर)

पारगाव(पालघर) हे भारतातील महाराष्ट्र राज्यातील उत्तर कोकणातील पालघर जिल्ह्यातील पालघर तालुक्यातील गाव आहे.


  ?पारगाव

महाराष्ट्र • भारत
प्रमाणवेळभाप्रवे (यूटीसी+५:३०)
क्षेत्रफळ.२४७ चौ. किमी
जवळचे शहरसफाळे
जिल्हापालघर जिल्हा
लोकसंख्या
घनता
१,५९७ (२०११)
• ६,४६६/किमी
भाषामराठी
सरपंच
कोड
पिन कोड
दूरध्वनी
• आरटीओ कोड

• ४०११०२
• +०२५२५
• एमएच४८

भौगोलिक स्थान

हे गाव सफाळे रेल्वे स्थानकापासून पूर्वेस ८ किमी अंतरावर स्थित आहे.

हवामान

पावसाळ्यात येथे मुसळधार पाऊस पडतो आणि हवामान समशीतोष्ण,दमट असते. उन्हाळ्यात वातावरण उष्ण असते तर हिवाळ्यात हवामान थंड, शीतल असते.

लोकजीवन

येथे मुख्यतः कुणबी व आदिवासी समाजातील लोक फार वर्षांपासून स्थायिक आहेत. मासेमारी, कुक्कुटपालन,नागलीशेती व भातशेती हे व्यवसाय पूर्वापार चालत आलेले आहेत. हल्ली काही प्रमाणात हॉटेल व्यवसाय सुरू झालेला आहे तसेच जवळपास रिसॉर्टसुद्धा बांधलेली आहेत.गावात ३९२ घरे आहेत.२०११ च्या जनगणनेनुसार ५० टक्के महिलांची संख्या आहे.एकूण साक्षरता प्रमाण ७२ टक्के असून महिलांची साक्षरता ३४ टक्के आहे. अनुसूचित जाती जमातीचे प्रमाण ३० टक्के आहे. गावात प्राथमिक शाळा तसेच माध्यमिक शाळा आहे.

नागरी सुविधा

सफाळे रेल्वे स्थानक ते पारगाव अशी नियमित राज्य परिवहन बससेवा उपलब्ध आहे. तसेच सफाळे ते वरई, नावझे, वसई,विरार जाणाऱ्या सर्व राज्य परिवहन बस पारगावला थांबतात.गावात प्राथमिक आरोग्य केंद्राची सोय उपलब्ध आहे.

जवळपासची गावे

मुंबई अहमदाबाद राष्ट्रीय महामार्ग ८ किमी अंतरावर आहे.सोनावे, तांदुळवाडी, गांजेढेकाळे,नावझे, दहिसर तर्फे मनोर ही गावे अनुक्रमे २किमी,३किमी,४किमी,४किमी,४किमी अंतरावर आहेत.

संदर्भ

https://www.census2011.co.in/data/subdistrict/4163-palghar-thane-maharashtra.html

२. http://tourism.gov.in/india-tourism-development-corporation-itdc