Jump to content

पापड

पापड
भाजलेला पापड
पर्यायी नावे पापड, अप्पडम, पापर, पंपड, पोप्पडम, अप्पलम, पप्पडम, पापडम
उगमभारतीय उपखंड
प्रदेश किंवा राज्य मुख्यतः भारतीय उपखंड
मुख्य घटक विविध डाळींचे पीठ, बेसन, बटाट्याचे पीठ, तांदळाचे पीठ
भिन्नतातांदूळ, साबुदाना किंवा बटाट्याचे पापड, मसाला पापड, लसुण पापड, आल्याचे पापड


पापड

पापड हा भारतीय उपखंडात प्रचलित असलेला पदार्थ आहे. हा पदार्थ अनेक प्रकारे बनवला जातो. नाजूक कुरकुरीतपणा हा पापडाचा प्रमुख गुणधर्म आहे. पापड उडीद हे कडधान्य वापरून प्रामुख्याने बनवले जातात. इतरही अनेक प्रकारचे पदार्थ पापड बनवण्यास वापरले जातात. जसे की पोहे, नागली पापड वगैरे. पापड कुर्कुरीत होण्यासाठी पापड बनवताना त्यात पापडखार वापरला जातो. यात पोटॅशियम कार्बोनेट, सोडियम कार्बोनेट ही रसायने असतात. हे आम्लारी पदार्थ असतात. उडीदात आम्ले असतात. पापद तळला किंवा भाजला जाताना उच्च तापमान मिळून यातील कर्बवायू मुक्त होतो. या कारणाने पापड प्रसरण पावून फुललेला म्हणजेच आकारमान मोठे झालेला आढळतो. पापडखार वापरल्याने पदार्थ टिक तात. पूर्वी जेवणासोबत पापड खाल्ला जात असे. आता जेवणाआधी सुरुवात म्हणून पापड खाण्याची पद्धत रूढ होते आहे. मारवाडी समाजात 'पापड लाओ' असे जेवणाऱ्याने म्हंटले म्हणजे त्याचे जेवण झाले असे समजतात.

अर्थकारण

मुंबईच्या लिज्जत गृह उद्योग या सहकारी उद्योगसमूहाने पापडाचे मोठ्या प्रमाणावर उत्पादन व वितरण सुरू केले. जोरदार जाहिरात, कमी खर्च व सदस्यांचे उत्तम सहकार्य यामुळे पापड घराघरात पोहोचला. मात्र याशिवायही अनेक उद्योग पापड निर्मितीमध्ये आहेत. पापडाची मोठी निर्यात भारत देशातून जगभर होते.

प्रकार

बटाटे, नाचणी, ज्वारी साबुदाणा, पोहे उडीद, मूग तांदूळ अशा अनेक प्रकारांचे पापड बनवले जातात.

उडीद

उडदाच्या पापडांमध्ये अनेक प्रकार असतात. मिरपूड घातलेले, मिरची घातलेले, लसूण घातलेले, लाल तिखट घातलेले असे विविध प्रकार या पापडांमध्ये असतात.

प्रकार

उपहारगृहात मिळणारे पापड: भाजलेला पापड, तळलेला पापड, मसाला पापड

भौगोलिक वैविध्य

सिंधी, पंजाबी अशा अनेक प्रकारचा पापड पारंपारिकरित्या बनवला जातो.सिंधी पद्धतीचा तांदुळाचा पापड चविष्ट असतो.

पाककृती

उडदाच्या पीठात पाणी व तेल मिसळून ते मळतात. हे मिश्रण तिखट, मीठ, जिरे घालून खूप कुटतात. कुटण्याच्या प्रक्रियेत हवा मिसळते व पापड कुरकुरीत होतात. पोह्याचे पीठ ताकात भिजवून पापड केले जातात. अशा पापडांना पापडखार आवश्यक नसतो. भाजलेल्या अथवा तळलेल्या पापडावर चिरलेला कांदा, टोमॅटो, काकडी आणि मीठ, मसाला, शेव टाकून मसाला पापड तयार केला जातो.