Jump to content

पानचक्की

१.इतिहास : पानचक्की हे छत्रपती संभाजीनगर शहरातील एक मुख्य आकर्षण स्थळ असून देशी विदेशी पर्यटकाचे खास आकर्षण केंद्र आहे. जगातील अनेक पर्यटक येथे भेट देऊन याची कौशल्यपूर्ण रचना पाहून प्रभावित होतात. बारमाही वाहणाऱ्या पाण्याच्या प्रवाहामुळे मोठे लोखंडी पाते आणि दगडी जाते यांना गती मिळते. छत्रपती संभाजीनगर येथे सद्यस्थितीतही मलिक अंबरने बांधलेल्या भुमिअंतर्गत भाजलेल्या मातीच्या पाईपलाइनद्वारे येणारे पाण्याचे नहर आजही पानचक्कीला पाणी पुरवितात. पानचक्कीला प्रवेश करण्यासाठी लगतच महमद दरवाजा आहे. या पाणचक्कीला जमिनीखाली असणाऱ्या पाईपलाइनद्वारे पाण्याचा अखंड पुरवठा होतो. हर्सूूल नदी व तीच्या एका उपप्रवाहाचा जेथे संगम होतो, तेथुन पानचक्कीच्या जलाशयास पाणीपुरवठा होतो. याची रचना अशी केली आहे की, पानचक्कीत उंचीवर असणाऱ्या जलकुंडातून येणाऱ्या गतीमान प्रवाहामुळे पानचक्की फिरते. हा जलाशय 164 x 31 फुट आकाराचा असून कारंजांनी सजवला आहे. यातुन बाहेर पडणारे पाणी खाम नदीत जाते. परिसरात हजरत बाबाशहा मुसाफिर आणि हजरत बाबा अहमद सईद यांचे दर्गे असून मस्जिद आणि सराई देखील आहेत. २. जगतिक अध्ययन केंद्र : पानचक्की हे जगातील सर्वोत्तम अध्ययन केंद्रापैकी एक होते. येथील ग्रंथालय आशिया खंडातील सर्वात मोठे ग्रंथालय होते. युरोपातील अभ्यासक आणि तज्ञ संशोधनासाठी या ग्रंथालयाला भेट देत असत. अनेक हस्तलिखिते स्वतः राजा-महाराजांनी लिहून ठेवलेली आहेत. सध्या पानचक्की येथे औरंगजेब यांच्या हस्ताक्षरातील पवित्र धर्मग्रंथ उपलब्ध आहे. त्याला तीनशे वर्षाचा इतिहास आहे. अनेक लिखितांना सोन्याचा मुलामा आहे. बाबाशाह मुसाफिर आणि बाबाशाहा पिलंगपोष हे बुखारा येथून छत्रपती संभाजीनगरला आले. या दोघांकडे येणाऱ्या भक्तांता ओढा वाढला. त्यातून येथे नहर उभारण्याची संकल्पना बाबाशाह मुसाफिर यांचे शिष्य बाबाशाह मेहमूद यांना सुचली. ३. नहर : सुरुवातीला एक छोटी मस्जिद आणि एक विहीर असलेला पानचक्की हा भाग 1744 मध्ये नहरीमुळे समृद्ध झाला. औरंगाबाद शहराचे वैभव असलेली नहर-ए-अंबरी तयार करण्यासाठी अवघ्या पंधरा महिन्यांचा अवधी लागला. नागरिकांची गरच लक्षात घेऊन मलिक अंबर यांनी ही संकल्पना आपल्या राजापुढे मांडली. मंलिक अंबरने साधारण दोन लाख रुपये खर्च करून नहर-ए-अंबरी अभारली. छत्रपती संभाजीनगरचे अखंड पाणी पुरवठा व्हावा आणि जीवंत पाण्याचा प्रवाह सतत शहरास व्हावा या हेतून शहरात ठिकठिकाणी हौद बांधले होते. वाहणाऱ्या पाण्याच्या शक्तीपासून कार्य कसे करून घ्यावे याचे उत्तम उदाहरण पानचक्कीच्या रूपाने सर्वांपुढे ठेवले आहे. वाहत्या पाण्याचा कृत्रिम प्रवाह निर्माण करून सैन्यासाठी भाकरी बनविण्यासाठी लागणाऱ्या धान्य दळणाचा प्रश्न कायमचा सोडवला. आजच्या यंत्रयुगात मध्ययुगीन स्थापत्य शास्त्राचा हा ठेवा आपली स्मृती उजाळत अभा आहे. सदर स्मारक हे निजामकाळात संरक्षित झालेले असून राज्यपुनर्रचनेनंतर या विभागाकडे हस्तांतरित झालेले आहे. हे स्मारक वक्फबोर्ड यांच्या तसेच या विभागाच्याही यादीवर असून सदरील स्मारकात मराठवाडा वक्फ बोर्ड यांचे कार्यालय आहे. या स्मारकाची दैनंदिन देखभाल वक्फ बोर्डाकडून होत आहे.