Jump to content

पाथर्डी

हा लेख पाथर्डी शहराविषयी आहे. पाथर्डी तालुक्याच्या माहितीसाठी पहा, पाथर्डी तालुका
पाथर्डी
भारतामधील शहर
पाथर्डी is located in India
पाथर्डी
पाथर्डी
पाथर्डीचे Indiaमधील स्थान
पाथर्डी is located in Maharashtra
पाथर्डी
पाथर्डी
पाथर्डीचे Maharashtraमधील स्थान

गुणक: 19°17′N 75°18′E / 19.283°N 75.300°E / 19.283; 75.300

देशभारत ध्वज भारत
राज्य महाराष्ट्र
जिल्हा अहमदनगर


पाथर्डी
जिल्हाअहमदनगर
राज्यमहाराष्ट्र
लोकसंख्या२२,८२७
२००१
दूरध्वनी संकेतांक०२४२८
टपाल संकेतांक४१४१०२
वाहन संकेतांकमहा- १६
निर्वाचित प्रमुखदिनकर पालवे
(नगराध्यक्ष)
प्रशासकीय प्रमुखबी. एम. साबळे
(मुख्याधिकारी)

पाथर्डी शहर हे भारताच्या महाराष्ट्र राज्यातील अहमदनगर जिल्ह्याच्या पाथर्डी तालुक्याचे मुख्यालय आहे. ह्या शहरातून राष्ट्रीय महामार्ग २२२ जातो. पाथर्डी शहरालगत अनेक प्रसिद्ध तीर्थक्षेत्र आहेत, ज्यामध्ये कानिफनाथ देवस्थान, मोहटादेवी, भगवानगड, संत सेवालाल महाराज देवस्थान, हरिहरेश्वर मंदिर ई प्रमुख देवस्थाने आहेत. या तालुक्यात मोठ्या संख्येने मराठा वंजारी, लमाण (बंजारा), तसेच मुस्लिम लोकसंख्या अढळून येते.

भूगोल

पाथर्डी शहर १९.१७ उत्तर व ७५.१८ पूर्व अक्षांश-रेखांशांवर असून समुद्रसपाटीपासून ५३३ मीटर उंचीवर आहे.

लोकसंख्या

२००१ च्या जनगणनेनुसार पाथर्डी शहराची लोकसंख्या २२,८२७ आहे. त्यांमधे ५२% पुरुष तर ४८% स्रियांचा समावेश आहे साक्षरता ७२% आहे

पाथर्डी तालुक्यात पार्थ रडला म्हणून पाथर्डी असे नाव ठेवण्यात आले अशी आख्यायिका आहे. पाथर्डी हे समृद्ध असे ठिकाण आहे पाथर्डी तालुक्यात श्रीक्षेत्र भगवानगड मोहटादेवी मंदिर आहे व श्री कानिफनाथ महाराज यांचे भव्य मंदिर आहे

संदर्भ