Jump to content

पाण म्हैस

म्हैस
मुऱ्हा जातीची पाण म्हैस
मुऱ्हा जातीची पाण म्हैस
शास्त्रीय वर्गीकरण
वंश: कणाधारी
जात: सस्तन
वर्ग: युग्मखुरी
कुळ: गवयाद्य
उपकुळ: गोवंश
जातकुळी: bubalus
जीव: bubalis
शास्त्रीय नाव
Bubalus bubalis
Linnaeus, इ.स. १८२७
आढळप्रदेश
आढळप्रदेश
इतर नावे

Bos bubalis

पाण म्हैस किंवा भारतीय म्हैस हा एक भारतीय म्हशीचा प्रकार आहे. हे दुधाळू जनावर आहे. नर म्हशीला रेडा म्हणतात. म्हैस हा प्राणी सर्वसाधारण काळ्या रंगाचा असतो. क्वचित, एखाद्या म्हशीच्या डोक्याचा थोडा भाग पांढरा असतो.[]

भारतीय म्हैस किंवा पाण म्हैस आणि जंगली म्हैस हे भारतात आढळणारे दोन वेगवेगळे उपप्रकार आहेत. भारतीय म्हशीला इंग्रजीत Water Buffalo किंवा River Buffalo असे म्हणतात. आणि जंगली म्हशीला Wild Water Buffalo असे म्हणतात. जेव्हा अमेरिकेचा शोध लागला तेव्हा तेथील बायसन पशूस चुकीने बफेलो असे संबोधले गेले. आणि बायसनचे ते नाव कायम झालं. तद्नंतर आशिया खंडातील म्हशींना बफेलो पासून वेगळेपणा दाखवण्यासाठी तिच्या पाण्याविषयीच्या आवडीवरून वॉटर हा शब्द लावला गेला.[] आफ्रिकन जंगली म्हैस भारतीय म्हशीसारखीच दिसते पण प्रत्यक्षात ती एका वेगळ्या जातीची (genus) आहे.

लहानग्या रेड्याला टोणगा म्हणतात. म्हशीच्या नर पिल्लाला पारडू आणि मादी पिल्लाला पारडी असे म्हणतात. मराठवाड्यात ग्रामीण भाषेत नर म्हशीला 'हल्ल्या' असे म्हणतात.

जाती

भारतात म्हशीच्या पुढील जाती आढळतात.[]

अ. क्र.प्रकारइतर नावेआढळस्थानचित्रअभिग्रहन क्रमांक
भदावरीउत्तर प्रदेश, मध्य प्रदेशINDIA_BUFFALO_2010_BHADAWARI_01003
जाफराबादीगुजरातINDIA_BUFFALO_0400_JAFFARABADI_01006
मराठवाडीमहाराष्ट्रINDIA_BUFFALO_1100_ MARATHWADI _01009
मेहसाणागुजरातINDIA_BUFFALO_0400_MEHSANA_01004
मुऱ्हाहरियाणाINDIA_BUFFALO_0500_MURRAH_01001
नागपुरीमहाराष्ट्रINDIA_BUFFALO_1100_NAGPURI_01007
निली रावीपंजाबINDIA_BUFFALO_1600_NILIRAVI_01002
पंढरपुरीमहाराष्ट्रINDIA_BUFFALO_1100_PANDHARPURI_01008
सुरतीगुजरातINDIA_BUFFALO_0400_SURTI_01005
१०तोडातामिळनाडूINDIA_BUFFALO_0018_TODA_01010
११बन्नीगुजरातINDIA_BUFFALO_0400_BANNI_01011
१२चिलीकाओडिशाINDIA_BUFFALO_1500_CHILIKA_01012
१३कलहंडीओडिशाINDIA_BUFFALO_1500_KALAHANDI_01013
१४लुइटआसाम, मणिपुरINDIA_BUFFALO_0212_LUIT_01014
१५बरगुरतामिळनाडूINDIA_BUFFALO_1800_BARGUR_01015
१६छत्तीसगढीछत्तीसगढINDIA_BUFFALO_2600_CHHATTISGARHI_01016
१७गोजरीपंजाब, हिमाचल प्रदेशINDIA_BUFFALO_1606_GOJRI_01017
१८धारवाडीकर्नाटकINDIA_BUFFALO_0800_DHARWADI_01018
१९मांडाओडिशाINDIA_BUFFALO_1500_MANDA_01019
२०पूर्णाथडीमहाराष्ट्रINDIA_BUFFALO_1100_PURNATHADI_01020

म्हशीना होणारे रोग

घटसर्फ, फऱ्या, काळपुळी, बुळकांड्या, लाळ खुरकुत, पोटफुगी.

हे सुद्धा पहा

संदर्भ

  1. ^ "महाराष्ट्र पशुधन विकास मंडळ" (PDF). 2022-06-18 रोजी मूळ पान (PDF) पासून संग्रहित. 2022-05-05 रोजी पाहिले.
  2. ^ "म्हैस". ३ मार्च २०२१ रोजी पाहिले.
  3. ^ "Registered Breeds Of Buffalo". nbagr.icar.gov.in (इंग्रजी भाषेत). ४ मार्च २०२४ रोजी पाहिले.

बाह्य दुवा