Jump to content

पाणी मोजण्याची एकके

पाणी मोजण्यासाठी वेगवेगळी एकके वापरात आहेत.

स्थिर पाणी मोजण्याची एकके - लिटर (Liter), घनफूट (Cubic meter), घनमीटर (Cubic meter) .

वाहते पाणी मोजण्याची एकके - टी एम सी (TMC), क्युसेक (Cusec), क्युमेक (Cumec)

स्थिर पाणी मोजण्याची एकके

एक टी एम सी (TMC) म्हणजे १,००,००,००,००० घनफूट = २८,३१६,८४६,५९२ लिटर = २८३१ कोटी लिटर

धरणांची पाणी साठवण्याची क्षमता टी एम सी (TMC)  या एककामध्ये मोजतात.

वाहते पाणी मोजण्याचे एकके

१ क्युसेक (Cusec) म्हणजे  १ क्युबिक फिट /सेकंद

एका सेकंदात एक घनफूट पाण्याचा प्रवाह म्हणजे एक क्युसेक होय. याचा अर्थ एक सेकंदात २८.३१ लिटर पाणी बाहेर पडते.

१ क्युमेक (Cumec) म्हणजे  १ क्युबिक मीटर /सेकंद

एका सेकंदात एक घनमीटर पाण्याचा प्रवाह म्हणजे एक क्युमेक होय. याचा अर्थ एक सेकंदात १,००० लिटर पाणी बाहेर पडते.