Jump to content

पाणबुडी

जपानची ओयाशिओ श्रेणीतील पाणबुडी

पाणबुडी हे पाण्याच्या खालून चालू शकणारे जहाज आहे. पाणबुडीला इंग्रजीत सबमरीन असे म्हणतात. दुसऱ्या महायुद्धात व त्या नंतरच्या काळात पाणबुडींचा आरमारी युद्धात मोठ्या प्रमाणावर वापर करण्यात आला. पाणबुडीचा सुरुवातीच्या काळात पत्ता लागणे महाकठीण काम होते. त्यामुळे पाणबुडींचा जहाजे बुडवायला मोठ्या प्रमाणावर उपयोग झाला. परंतु तंत्रज्ञानाच्या प्रगती नंतर पाणबुडींचा पत्ता लावणे देखील सोपे झाले. त्यामुळे पाणबुडींचे सामरिक महत्त्व मर्यादित होण्यास मदत झाली. तसेच लहान आकारामुळे पाणबुडींचा वापर मर्यादित होतो.