Jump to content

पाणकोंबडा

हरयाणातील एक पानकोंबडा
आंध्र प्रदेशातील लहान/अविकसित पानकोंबडा

पानकोंबडा किंवा केमकुकडी किंवा टूमटूम (इंग्लिश:Kora, Watercock ; हिंदी:कांगरा, कोरा) हा एक पाणपक्षी आहे.

हा पक्षी आकाराने गाव-तित्तीरापेक्षा मोठा असतो. तांबडी चोच (टोक पिवळे). कपाळावर लहान त्रिकोणी आकाराचे पिवळट शिंगासारखे कवच. काळा रंग. शेपाटीखालचा भाग पिवळट. तांबडे पाय. मादीचा तसेच विणीचा हंगाम सोडून इतर वेळी नराचा वर्ण पिंगट तपकिरी. गर्द व रुंद रेषा आणि गर्द पट्टे. चोच आणि पाय हिरवट असतात.

वितरण

ते स्थायिक आणि कमी अंतरावर स्थलांतर करणारे पक्षी आहेत. पाकिस्तान तसेच भारतात दक्षिण हिमालयापासून आसाम आणि बांगला देश आणि श्रीलंका या प्रदेशात ते आढळतात.

निवासस्थाने

ते दलदल, भातशेती आणि तळी अश्या ठिकाणी राहतात.

संदर्भ

  • पक्षीकोश - मारुती चितमपल्ली