Jump to content

पाटा वरवंटा

पाटा वरवंटा

पाटा वरवंटा हे, स्वयंपाकासाठी बाह्य-साधन म्हणून, यांत्रिक साधने येण्यापूवीचे, एक चटणी वाटायचे (बनवायचे) दगडी साधन होते. यात एक पंचकोनी व एक दंडगोलाकार आकाराचे दगडी भाग असत.त्यांच्या साहाय्याने चटणी वा जेवणातील तत्सम पदार्थ तयार केले जात. आजही कित्येक खेडेगावांमध्ये पाटा वरवंटा वापरतात. [वडार|वडारी]] व बेलदार लोक पाटा वरवंटा बनवतात.

भारतात, पाटा वरवंटा हा बहुधा कठीण अशा दगडांपासून (ब्लॅक बेसॉल्ट)पासून बनविला जातो. राजस्थानचा लाल दगडही यासाठी क्वचित वापरला जातो. हा दगड खरखरीत असतो.पाट्या-वरवंट्यात 'ठेचणे' व 'रगडणे' या क्रिया एकाचवेळी करता येतात.

वापरून गुळगुळीत झालेल्या पाट्या-वरवंट्यास परत टाके/टाचे मारून घेतात त्यामुळे तो परत खरखरीत होतो व त्यावर वाटणे सोपे होते. या पद्धतीस पाटा 'टाकवून घेणे' असे म्हणतात. पाटा वरवंटा नवीन घेतल्यानंतर अथवा तो टाकवून घेतल्यानंतर,त्याचा नित्य उपयोग सुरू करण्यापूर्वी, त्यावर आधी २-३ वेळा रांगोळी वाटतात. त्यामुळे टाकवल्याने निर्माण होणारे दगडाचे लहान कण निघून जातात व वाटणामध्ये 'कचकच' येत नाही.

पाटा वरवंटा वापरून बनविलेली चटणी मिक्सर/ग्राईंडर मधल्या चटणीपेक्षा अधिक सरस व चवदार बनते कारण यात घटक ठेचल्या व वाटल्या जातात व त्याची चव उसळून वर येते, तर मिक्सरमध्ये त्या घटकांचे फक्त लहान लहान (सूक्ष्म) तुकडे होतात.

यावर वाटण्यात आलेल्या जिन्नसास 'वाटण' असे म्हणतात.