पाटणा जंक्शन रेल्वे स्थानक
पाटणा भारतीय रेल्वे स्थानक | |
---|---|
स्थानक तपशील | |
पत्ता | पाटणा, बिहार |
गुणक | 25°36′10″N 85°8′15″E / 25.60278°N 85.13750°E |
मार्ग | दिल्ली–हावडा मुख्य रेल्वेमार्ग पाटणा-गया मार्ग |
फलाट | १० |
इतर माहिती | |
उद्घाटन | इ.स. १८६२ |
विद्युतीकरण | होय |
संकेत | PNBE |
मालकी | रेल्वे मंत्रालय, भारतीय रेल्वे |
विभाग | दानापूर विभाग, पूर्व मध्य रेल्वे |
स्थान | |
पाटणा जंक्शन हे बिहार राज्याच्या पाटणा शहरामधील सर्वात मोठे रेल्वे स्थानक आहे. बिहारमधील सर्वात मोठे व वर्दळीचे असलेले पाटणा स्थानक दिल्ली ते कोलकाता ह्या प्रमुख रेल्वेमार्गावर स्थित असून पश्चिम बंगाल व ईशान्य भारताकडे जाणाऱ्या बहुतेक सर्व गाड्यांचा येथे थांबा आहे. पाटणा स्थानकावरील ताण कमी करण्यासाठी येथे राजेंद्रनगर हे नवे स्थानक चालू करण्यात आले आहे.
प्रमुख रेल्वेगाड्या
- पाटणा−हावडा जन शताब्दी एक्सप्रेस
- पाटणा−लोकमान्य टिळक टर्मिनस एक्सप्रेस
- पाटणा−पुणे एक्सप्रेस
- पाटणा−बंगळूर संगमित्रा एक्सप्रेस
- हावडा राजधानी एक्सप्रेस
- पाटणा राजधानी एक्सप्रेस
- दिब्रुगढ राजधानी एक्सप्रेस
- पूर्वोत्तर संपर्क क्रांती एक्सप्रेस