Jump to content

पाचरकलम

पाचरकलम (इंग्लिश:Cleft Grafting) कलमाची ही फार जुनी पद्धत आहे. जुन्या झाडांचे चांगल्या जातीत रूपांतर करताना पाश्चात्य देशात या पद्धतीचा वापर करतात. पाश्चात्य देशात झाडांना नवीन फुट यावयाच्या आधी म्हणजे झाडे सुप्ताव्स्थेत असतात त्या काळात हे कलम करतात. कलमफांदी सुप्ताव्स्थेतिल व डोळा न फुटलेली घ्यावी. फांदीवर वा जाड खुंटावर पाचरकलम करण्यापूर्वी खोडवर छेद घेण्याकरता मोठ्या कोयत्याचा वापर करावा.