Jump to content

पाकिस्तान रेल्वे

पाकिस्तान रेल्वे
प्रकार सरकारी उद्योग
उद्योग क्षेत्र रेल्वे वाहतूक
स्थापना इ.स. १८६१
मुख्यालयलाहोर, पाकिस्तान ध्वज पाकिस्तान
सेवा प्रवासी वाहतूक, माल वाहतूक, पार्सल सेवा
महसूली उत्पन्न ५,४५९ कोटी पाकिस्तानी रुपये
कर्मचारी ७२,०७८
पालक कंपनी पाकिस्तान रेल्वे मंत्रालय
विभाग
पोटकंपनी
संकेतस्थळhttps://www.pakrail.gov.pk
पाकिस्तान रेल्वेचा नकाशा

पाकिस्तान रेल्वे (उर्दू: پاکستان ریلویز ) ही पाकिस्तान देशाची राष्ट्रीय रेल्वे कंपनी आहे. एकूण ७,७९१ किमी लांबीचे लोहमार्गाचे जाळे असलेली पाकिस्तान रेल्वे देशामध्ये प्रवासी व मालवाहतूक पुरवते. आजच्या घडीला पाकिस्तानमधील एकूण वाहतूकीपैकी केवळ ४ टक्के वाहतूक पाकिस्तान रेल्वेद्वारे करण्यात येते. २०१८-१९ साली सुमारे ७ कोटी प्रवाशांनी पाकिस्तान रेल्वेमधून प्रवास केला.

प्रमुख्याने ब्रॉड गेजवर धावणाऱ्या पाकिस्तान रेल्वेचे ५ प्रमुख मार्ग असून दक्षिणेकडील कराचीला लाहोररावळपिंडीमार्गे पेशावरसोबत जोडणारा मार्ग देशातील सर्वाधिक वर्दळीचा रेल्वेमार्ग आहे. आजच्या घडीला सर्व रेल्वे वाहतूक डिझेल इंजिनांद्वारेच करण्यात येते.

बाह्य दुवे