Jump to content

पाकिस्तान महिला क्रिकेट संघाचा दक्षिण आफ्रिका दौरा, २०२०-२१

पाकिस्तान महिला क्रिकेट संघाचा दक्षिण आफ्रिका दौरा, २०२०-२१
दक्षिण आफ्रिका महिला
पाकिस्तान महिला
तारीख२० जानेवारी – ३ फेब्रुवारी २०२१
संघनायकसुने लूसजव्हेरिया खान (म.ए.दि., ३री म.ट्वेंटी२०)
आलिया रियाझ (१ली आणि २री म.ट्वेंटी२०)
एकदिवसीय मालिका
निकालदक्षिण आफ्रिका महिला संघाने ३-सामन्यांची मालिका ३–० जिंकली
सर्वाधिक धावालॉरा वॉल्व्हार्ड (१२५) आलिया रियाझ (१३६)
सर्वाधिक बळीआयाबाँगा खाका (७)
शबनिम इस्माइल (७)
डायना बेग (९)
२०-२० मालिका
निकालदक्षिण आफ्रिका महिला संघाने ३-सामन्यांची मालिका २–१ जिंकली
सर्वाधिक धावातझमीन ब्रिट्स (११८‌) कैनात इम्तियाझ (७९)
सर्वाधिक बळीशबनिम इस्माइल (७) अनाम अमीन (४)
मालिकावीरतझमीन ब्रिट्स (दक्षिण आफ्रिका)

पाकिस्तान राष्ट्रीय महिला क्रिकेट संघाने जानेवारी-फेब्रुवारी २०२१ मध्ये ३ महिला आंतरराष्ट्रीय ट्वेंटी२० सामने आणि ३ महिला आंतरराष्ट्रीय एकदिवसीय सामने खेळण्यासाठी दक्षिण आफ्रिकेचा दौरा केला. आधीच्या वेळापत्रकानुसार काही सामने हे पीटरमारित्झबर्गमधील सिटी ओव्हल वर आयोजित केले गेले होते. परंतु १० जानेवारी २०२१ रोजी दक्षिण आफ्रिकन क्रिकेट बोर्डाने सर्व सामने डर्बन शहरातील किंग्जमेडवर हलवले.

दौरा जाहीर झाल्यानंतर पाकिस्तानी कर्णधार बिस्माह मारूफ हिने वैयक्तिक कारणाने दौऱ्यातून माघार घेतली. तिच्या जागी पाकिस्तानी संघाची जवाबदारी जव्हेरिया खानकडे सोपवली गेली. दक्षिण आफ्रिकेची नियमीत कर्णधार डेन व्हान नीकर्क ही सुद्धा दुखापतीमुळे खेळू शकली नाही. क्रिकेट दक्षिण आफ्रिकेने सुने लूसकडे दक्षिण आफ्रिकेच्या महिला संघाच्या कर्णधारपदाची धुरा सोपवली.

पहिल्या महिला आंतरराष्ट्रीय एकदिवसीय सामन्यात प्रथम फलंदाजी करून २००/९ धावसंख्या उभारल्यानंतर दक्षिण आफ्रिकेच्या महिलांनी पाकिस्तानी महिला क्रिकेट संघाला ३ धावांनी मात दिली. दुसऱ्या सामन्यातसुद्धा दक्षिण आफ्रिकेने पाकिस्तानी महिलांचा १३ धावांनी पराभव करत एकदिवसीय मालिका जिंकली. दुसरा एकदिवसीय सामना हा शबनिम इस्माइलचा १००वा महिला आंतरराष्ट्रीय एकदिवसीय सामना होता. तिसऱ्या सामन्यात सुद्धा निर्भेळ यश संपादन करत दक्षिण आफ्रिकी महिलांनी महिला आंतरराष्ट्रीय एकदिवसीय मालिका ३-० अशी जिंकली.

दुखापतीमुळे जव्हेरिया खानला पहिल्या महिला ट्वेंटी२० सामन्यासाठी पाकिस्तानच्या संघातून वगळण्यात आले आणि आलिया रियाझकडे तिच्या अनुपस्थितीत संघाचे नेतृत्व सोपविले गेले. दक्षिण आफ्रिका महिलांनी पहिला सामना जिंकला. दुसऱ्या सामन्यासाठी देखीला आलिया लाच पाकिस्तानी कर्णधार बनविले गेले. दुसरा सामना देखील दक्षिण आफ्रिका महिलांनी जिंकत मालिका जिंकली. ट्वेंटी२० मालिकेतील शेवटचा सामना पाकिस्तान महिलांनी डकवर्थ-लुईस पद्धतीनुसार ८ धावांनी जिंकत या दौऱ्यातील पहिला विजय नोंदवला.

दक्षिण आफ्रिकेच्या दौऱ्यानंतर पाकिस्तानी महिला संघ ३ अनौपचारिक वनडे आणि २ महिला आंतरराष्ट्रीय ट्वेंटी२० सामने खेळण्यासाठी झिम्बाब्वेच्या दौऱ्यावर रवाना झाला.

महिला आंतरराष्ट्रीय एकदिवसीय मालिका

१ला सामना

२० जानेवारी २०२१
१०:००
धावफलक
दक्षिण आफ्रिका Flag of दक्षिण आफ्रिका
२००/९ (५० षटके)
वि
पाकिस्तानचा ध्वज पाकिस्तान
१९७/८ (५० षटके)
मारिझान्ने काप ४७ (५८)
डायना बेग ३/४६ (१० षटके)
निदा दर ५९* (९३)
शबनिम इस्माइल ३/४२ (१० षटके)
दक्षिण आफ्रिका महिला ३ धावांनी विजयी.
किंग्जमेड, डर्बन
सामनावीर: शबनिम इस्माइल (दक्षिण आफ्रिका)
  • नाणेफेक : पाकिस्तान महिला, क्षेत्ररक्षण.
  • नॉनकुलुलेको लाबा (द.आ.) हिने महिला आंतरराष्ट्रीय एकदिवसीय पदार्पण केले.

२रा सामना

२३ जानेवारी २०२१
१०:००
धावफलक
दक्षिण आफ्रिका Flag of दक्षिण आफ्रिका
२५२/७ (५० षटके)
वि
पाकिस्तानचा ध्वज पाकिस्तान
२३८/९ (५० षटके)
मेरिझॅन कॅप ६८* (४५)
डायना बेग २/४३ (९ षटके)
आलिया रियाझ ८१ (९५)
आयाबाँगा खाका ४/४० (१० षटके)
दक्षिण आफ्रिका महिला १३ धावांनी विजयी.
किंग्जमेड, डर्बन
सामनावीर: मेरिझॅन कॅप (दक्षिण आफ्रिका)
  • नाणेफेक : पाकिस्तान महिला, क्षेत्ररक्षण.


३रा सामना

२६ जानेवारी २०२१
१०:००
धावफलक
दक्षिण आफ्रिका Flag of दक्षिण आफ्रिका
२०१ (५० षटके)
वि
पाकिस्तानचा ध्वज पाकिस्तान
१६९ (४८ षटके)
लॉरा वॉल्व्हार्ड ५८ (७२)
डायना बेग ४/३० (१० षटके)
दक्षिण आफ्रिका महिला ३२ धावांनी विजयी.
किंग्जमेड, डर्बन
सामनावीर: शबनिम इस्माइल (दक्षिण आफ्रिका)
  • नाणेफेक : पाकिस्तान महिला, क्षेत्ररक्षण.
  • तझमीन ब्रिट्स (द.आ.) हिने महिला आंतरराष्ट्रीय एकदिवसीय पदार्पण केले.


महिला आंतरराष्ट्रीय ट्वेंटी२० मालिका

१ला सामना

२९ जानेवारी २०२१
१५:३० (दि/रा)
धावफलक
पाकिस्तान Flag of पाकिस्तान
१२४/८ (२० षटके)
वि
दक्षिण आफ्रिकाचा ध्वज दक्षिण आफ्रिका
१२५/२ (१९ षटके)
आयेशा नसीम ३१ (२५)
मेरिझॅन कॅप ३/२४ (४ षटके)
तझमीन ब्रिट्स ५२* (५४)
ऐमान अनवर २/२९ (४ षटके)
दक्षिण आफ्रिका महिला ८ गडी राखून विजयी.
किंग्जमेड, डर्बन
सामनावीर: तझमीन ब्रिट्स (दक्षिण आफ्रिका)
  • नाणेफेक : पाकिस्तान महिला, फलंदाजी.


२रा सामना

३१ जानेवारी २०२१
१५:३० (दि/रा)
धावफलक
दक्षिण आफ्रिका Flag of दक्षिण आफ्रिका
१३३/५ (२० षटके)
वि
पाकिस्तानचा ध्वज पाकिस्तान
११५/७ (२० षटके)
तझमीन ब्रिट्स ६६ (५८)
अनाम अमीन २/२१ (४ षटके)
आलिया रियाझ ३९ (४०)
शबनिम इस्माइल ५/१२ (४ षटके)
दक्षिण आफ्रिका महिला १८ धावांनी विजयी.
किंग्जमेड, डर्बन
सामनावीर: शबनिम इस्माइल (दक्षिण आफ्रिका)
  • नाणेफेक : पाकिस्तान महिला, क्षेत्ररक्षण.


३रा सामना

३ फेब्रुवारी २०२१
१५:३० (दि/रा)
धावफलक
पाकिस्तान Flag of पाकिस्तान
१२७/६ (२० षटके)
वि
दक्षिण आफ्रिकाचा ध्वज दक्षिण आफ्रिका
६८/४ (१२.३ षटके)
जव्हेरिया खान ५६* (५०)
नॉनदुमिसू शंघाशे ३/२० (४ षटके)
मिग्नॉ डू प्रीझ २४* (२३)
निदा दर १/१३ (२ षटके)
पाकिस्तान महिला ८ धावांनी विजयी (ड/लु पद्धत).
किंग्जमेड, डर्बन
सामनावीर: जव्हेरिया खान (पाकिस्तान)
  • नाणेफेक : दक्षिण आफ्रिका महिला, क्षेत्ररक्षण.
  • पावसामुळे दक्षिण आफ्रिका महिलांना १२.३ षटकांमध्ये ७७ धावांचे लक्ष्य देण्यात आले.