पाकिस्तान महिला क्रिकेट संघाचा झिम्बाब्वे दौरा, २०२०-२१
पाकिस्तान महिला क्रिकेट संघाचा झिम्बाब्वे दौरा, २०२०-२१ | |||||
झिम्बाब्वे महिला | पाकिस्तान महिला | ||||
तारीख | ९ – २० फेब्रुवारी २०२१ | ||||
संघनायक | मेरी-ॲन मुसोंडा | जव्हेरिया खान | |||
२०-२० मालिका |
पाकिस्तान राष्ट्रीय महिला क्रिकेट संघाने फेब्रुवारी २०२१ मध्ये ३ महिला आंतरराष्ट्रीय ट्वेंटी२० सामने आणि ३ अनौपचारिक महिला आंतरराष्ट्रीय एकदिवसीय सामने खेळण्यासाठी झिम्बाब्वेचा दौरा केला. पाकिस्तानी महिलांनी प्रथमच झिम्बाब्वेचा दौरा केला. जानेवारी मध्ये दक्षिण आफ्रिकेच्या दौऱ्यावरून पाकिस्तान संघ झिम्बाब्वेत दाखल झाला. याआधी मे २०१९मध्ये झिम्बाब्वेने शेवटचा आंतरराष्ट्रीय सामना खेळला होता. जानेवारी २०२१ मध्ये झिम्बाब्वेच्या क्रीडा मंत्रालयाने दौऱ्या घेण्यास परवानगी दिली. सर्व सामने हरारे येथील हरारे स्पोर्ट्स क्लब मैदानावर खेळविण्यात आले.
झिम्बाब्वे महिला संघाला महिला आंतरराष्ट्रीय एकदिवसीय दर्जा (महिला वनडे) नसल्याने ५० षटकांच्या सामने हे अधिकृत महिला आंतरराष्ट्रीय एकदिवसीय सामने म्हणून गणले गेले नाहीत. मेरी-ॲन मुसोंडाला झिम्बाब्वेची कर्णधार म्हणून नियुक्त करण्यात आले तर पाकिस्तानचे नेतृत्व जव्हेरिया खानकडेच कायम ठेवण्यात आले.
पहिला एकदिवसीय सामना पाकिस्तानी महिलांनी जिंकला. परंतु एमायरेट्स हवाई कंपनीने हरारे-पाकिस्तानला जाणारी विमाने कोविडमुळे रद्द करण्याची घोषणा केली. त्यामुळे पाकिस्तानी महिला संघ १२ फेब्रुवारीला लाहोरला परतला. उर्वरीत दौरा रद्द केला गेला. झिम्बाब्वे व्यवस्थापनेनी या घटनेवर तीव्र नाराजी व्यक्त केली.
अनौपचारिक महिला एकदिवसीय मालिका
१ला सामना
पाकिस्तान २५५/६ (५० षटके) | वि | झिम्बाब्वे ७७ (३४.१ षटके) |
जव्हेरिया खान ८१ (११६) नॉमवेलो सिबांदा २/२८ (८ षटके) |
- नाणेफेक : झिम्बाब्वे महिला, क्षेत्ररक्षण.