पाकिस्तान क्रिकेट संघाचा भारत दौरा, १९५२-५३
पाकिस्तान क्रिकेट संघाचा भारत दौरा, १९५२-५३ | |||||
भारत | पाकिस्तान | ||||
तारीख | १६ ऑक्टोबर – १५ डिसेंबर १९५२ | ||||
संघनायक | लाला अमरनाथ | अब्दुल कारदार | |||
कसोटी मालिका | |||||
निकाल | भारत संघाने ५-सामन्यांची मालिका २–१ जिंकली | ||||
सर्वाधिक धावा | पॉली उम्रीगर (२५८) | वकार हसन (३५७) | |||
सर्वाधिक बळी | विनू मांकड (२५) | फझल महमूद (२०) |
पाकिस्तान क्रिकेट संघाने ऑक्टोबर-डिसेंबर १९५२ दरम्यान ५ कसोटी सामने खेळण्यासाठी भारताचा दौरा केला होता. इसवी सन १९४७ मध्ये अखंड भारताची फाळणी झाल्यामुळे पाकिस्तान देशाकरता नव्या संघाची स्थापना झाली. परंतु स्वातंत्र्यानंतर पाकिस्तानला कसोटी दर्जा देण्यात आला नव्हता. इसवी सन १९५१ मध्ये इंग्लंडने भारताविरुद्ध कसोटी मालिका खेळल्यानंतर पाकिस्तानसोबत इंग्लंडने प्रथम-श्रेणी सामने खेळले. जून १९५२ मध्ये भारताने आयसीसीकडे पाकिस्तानला कसोटी दर्जा द्यावा अशी विनंती केली. स्वातंत्र्यापूर्वी पाकिस्तानचे खेळाडू भारताकडून कसोटी खेळल्याने आयसीसीने पाकिस्तानला कसोटी दर्जा बहाल केला.
बीसीसीआय आणि पाकिस्तान क्रिकेट बोर्डाच्या संमतीने पाकिस्तान संघ आपल्या पहिल्या वहिल्या कसोटी सामन्यासाठी भारतात पोहोचला. अब्दुल कारदार ज्याने स्वातंत्र्यापुर्वी भारताकडून कसोटी सामने खेळले त्याने या दौऱ्यात पाकिस्तानचे नेतृत्व केले. कसोटी मालिका भारताने २-१ अशी जिंकली. पाकिस्तानने आपल्या दुसऱ्याच कसोटीत पहिला वहिला विजय मिळवला. पाकिस्तानने या दौऱ्यात ७ प्रथम-श्रेणी सराव सामने देखील खेळले.
सराव सामने
तीन-दिवसीय सामना:उत्तर विभाग वि पाकिस्तान
तीन-दिवसीय सामना:मध्य विभाग वि पाकिस्तान
३१ ऑक्टोबर - २ नोव्हेंबर १९५२ धावफलक |
पाकिस्तान | वि | |
९८/८ (२६ षटके) बलबीर खन्ना ४३ खालिद कुरेशी ५/२१ (९ षटके) |
- नाणेफेक: पाकिस्तान, फलंदाजी.
तीन-दिवसीय सामना:पश्चिम विभाग वि पाकिस्तान
तीन-दिवसीय सामना:बॉम्बे वि पाकिस्तान
तीन-दिवसीय सामना:दक्षिण विभाग वि पाकिस्तान
२१-२३ नोव्हेंबर १९५२ धावफलक |
पाकिस्तान | वि | |
३५२/६घो (१६०.४ षटके) एल.टी. आदिसेश ८७ खालिद कुरेशी २/११७ (५५ षटके) | ||
४४/२ (११ षटके) इम्तियाझ अहमद २१ मोथवरपू सुर्यनारायणन १/११ (२ षटके) |
- नाणेफेक: पाकिस्तान, फलंदाजी.
तीन-दिवसीय सामना:भारतीय विद्यापीठे वि पाकिस्तान
तीन-दिवसीय सामना:पूर्व विभाग वि पाकिस्तान
१९-२१ डिसेंबर १९५२ धावफलक |
पाकिस्तान | वि | |
२००/७घो (५५ षटके) खुर्शिद शेख ६९ एस. दास ३/५४ (१२ षटके) |
- नाणेफेक: पाकिस्तान, फलंदाजी.
कसोटी मालिका
१ली कसोटी
१६-१८ ऑक्टोबर १९५२ धावफलक |
भारत | वि | पाकिस्तान |
- नाणेफेक: भारत, फलंदाजी.
- पाकिस्तानचा पहिला कसोटी सामना.
- भारतीय भूमीवर पाकिस्तानचा पहिला कसोटी सामना.
- नझर मोहम्मद, हनीफ मोहम्मद, इस्रार अली, इम्तियाझ अहमद, मकसूद अहमद, अन्वर हुसेन, वकार हसन, फझल महमूद आणि खान मोहम्मद (पाक) या सर्वांनी कसोटी पदार्पण केले.
- अमीर इलाही आणि अब्दुल कारदार यांनी आधी भारताकडून खेळल्यानंतर या कसोटीतून पाकिस्तानतर्फे कसोटी पदार्पण केले.
२री कसोटी
२३-२६ ऑक्टोबर १९५२ धावफलक |
भारत | वि | पाकिस्तान |
- नाणेफेक: भारत, फलंदाजी.
- हिरालाल गायकवाड, शाह न्यालचंद (भा), झुल्फिकार अहमद आणि महमूद हुसेन (पाक) या सर्वांनी कसोटी पदार्पण केले.
- पाकिस्तानचा पहिला कसोटी विजय.
- दुसऱ्याच कसोटीत पहिला कसोटी विजय मिळविणारा पाकिस्तान हा इंग्लंडनंतरचा दुसरा संघ ठरला.
- या मैदानावरचा पहिला कसोटी सामना.
३री कसोटी
१३-१६ नोव्हेंबर १९५२ धावफलक |
पाकिस्तान | वि | भारत |
४५/० (१५.२ षटके) विनू मांकड ३५ |
- नाणेफेक: पाकिस्तान, फलंदाजी.
- माधव आपटे, बाळ दाणी, विजय राजिंदरनाथ (भा) आणि वझीर मोहम्मद (पाक) या सर्वांनी कसोटी पदार्पण केले.
४थी कसोटी
२८ नोव्हेंबर - १ डिसेंबर १९५२ धावफलक |
पाकिस्तान | वि | भारत |
- नाणेफेक: पाकिस्तान, फलंदाजी.
- पावसामुळे शेवटच्या दोन दिवसांचा खेळ होऊ शकला नाही.
- इब्राहीम माका (भा) याने कसोटी पदार्पण केले.