पाकिस्तान क्रिकेट संघाचा झिम्बाब्वे दौरा, २०२०-२१
पाकिस्तान महिला क्रिकेट संघाचा झिम्बाब्वे दौरा, २०२०-२१ याच्याशी गल्लत करू नका.
झिम्बाब्वे क्रिकेट संघाचा पाकिस्तान दौरा, २०२०-२१ याच्याशी गल्लत करू नका.
पाकिस्तान क्रिकेट संघाचा झिम्बाब्वे दौरा, २०२०-२१ | |||||
झिम्बाब्वे | पाकिस्तान | ||||
तारीख | २१ एप्रिल – ११ मे २०२१ | ||||
संघनायक | शॉन विल्यम्स (१ली,३री ट्वेंटी२०) ब्रेंडन टेलर (२री ट्वेंटी२०) | बाबर आझम | |||
कसोटी मालिका | |||||
निकाल | पाकिस्तान संघाने २-सामन्यांची मालिका २–० जिंकली | ||||
सर्वाधिक धावा | रेजिस चकाब्वा (१४६) | आबिद अली (२७५) | |||
सर्वाधिक बळी | ब्लेसिंग मुझाराबानी (७) | हसन अली (१४) | |||
मालिकावीर | हसन अली (पाकिस्तान) | ||||
२०-२० मालिका | |||||
निकाल | पाकिस्तान संघाने ३-सामन्यांची मालिका २–१ जिंकली | ||||
सर्वाधिक धावा | वेस्ली मढीवेरे (८९) | मोहम्मद रिझवान (१८६) | |||
सर्वाधिक बळी | ल्युक जाँग्वे (९) | मोहम्मद हसनैन (५) | |||
मालिकावीर | मोहम्मद रिझवान (पाकिस्तान) |
पाकिस्तान क्रिकेट संघाने एप्रिल - मे २०२१ मध्ये तीन आंतरराष्ट्रीय ट्वेंटी२० सामने आणि दोन कसोटी सामने खेळण्यासाठी झिम्बाब्वेचा दौरा केला. सर्व सामने हे हरारे येथील हरारे स्पोर्ट्स क्लब मैदानावर खेळवले गेले.
पाकिस्तानने पहिला ट्वेंटी२० सामना जिंकत दौऱ्याची विजयी सुरुवात केली. दुसऱ्या सामन्यात पाकिस्तानचा दणदणीत पराभव करत झिम्बाब्वेने मालिकेत जोरदार पुनरागमन केले. हा पाकिस्तानवर झिम्बाब्वेने मिळवलेला पहिला ट्वेंटी२० विजय होता. दोन सामने झाल्यानंतर मालिकेत १-१ अशी बरोबरी झाली होती. तिसरा आणि शेवटचा सामन्यात पाकिस्तानने विजय मिळवत तीन सामन्यांची ट्वेंटी२० मालिका २-१ ने जिंकली.
कसोटी मालिका पाकिस्तानने २-० ने जिंकली.
आंतरराष्ट्रीय ट्वेंटी२० मालिका
१ला सामना
पाकिस्तान १४९/७ (२० षटके) | वि | झिम्बाब्वे १३८/७ (२० षटके) |
- नाणेफेक : झिम्बाब्वे, क्षेत्ररक्षण.
- ताडीवनाशे मरुमानी (झि) आणि दानिश अझीझ (पाक) या दोघांनी आंतरराष्ट्रीय ट्वेंटी२० पदार्पण केले.
२रा सामना
झिम्बाब्वे ११८/९ (२० षटके) | वि | पाकिस्तान ९९ (१९.५ षटके) |
- नाणेफेक : पाकिस्तान, क्षेत्ररक्षण.
- अर्शद इक्बाल (पाक) याने आंतरराष्ट्रीय ट्वेंटी२० पदार्पण केले.
- आंतरराष्ट्रीय ट्वेंटी२० सामन्यात झिम्बाब्वेने पाकिस्तान वर पहिल्यांदाच विजय मिळवला.
३रा सामना
पाकिस्तान १६५/३ (२० षटके) | वि | झिम्बाब्वे १४१/७ (२० षटके) |
- नाणेफेक : पाकिस्तान, फलंदाजी.
कसोटी मालिका
१ली कसोटी
२९ एप्रिल - ३ मे २०२१ धावफलक |
झिम्बाब्वे | वि | पाकिस्तान |
- नाणेफेक: झिम्बाब्वे, फलंदाजी.
- रॉय कैया, रिचर्ड नगारावा, मिल्टन शुंभा (झि) आणि साजिद खान (पाक) या सर्वांनी कसोटी पदार्पण केले.
- लँग्टन रुसेरे कसोटी मध्ये पंचगिरी करणारे पहिले कृष्णवर्णीय आफ्रिकन पंच ठरले.
२री कसोटी
७-११ मे २०२१ धावफलक |
पाकिस्तान | वि | झिम्बाब्वे |
- नाणेफेक: पाकिस्तान, फलंदाजी.
- ल्युक जाँग्वे (झि) आणि तबीश खान (पाक) या दोघांनी कसोटी पदार्पण केले.