पाकिस्तान क्रिकेट संघाचा इंग्लंड दौरा, २०२१
पाकिस्तान क्रिकेट संघाचा इंग्लंड दौरा, २०२१ | |||||
इंग्लंड | पाकिस्तान | ||||
तारीख | ८ – २० जुलै २०२१ | ||||
संघनायक | बेन स्टोक्स (ए.दि.) आयॉन मॉर्गन (२री ट्वेंटी२०) जोस बटलर (२री ट्वेंटी२०) | बाबर आझम | |||
एकदिवसीय मालिका | |||||
निकाल | इंग्लंड संघाने ३-सामन्यांची मालिका ३–० जिंकली | ||||
सर्वाधिक धावा | जेम्स व्हिन्स (१५८) | बाबर आझम (१७७) | |||
सर्वाधिक बळी | साकिब महमूद (९) | हसन अली (६) हॅरीस रौफ (६) | |||
मालिकावीर | साकिब महमूद (इंग्लंड) | ||||
२०-२० मालिका | |||||
निकाल | इंग्लंड संघाने ३-सामन्यांची मालिका २–१ जिंकली | ||||
सर्वाधिक धावा | लियाम लिविंगस्टोन (१४७) | मोहम्मद रिझवान (१७६) | |||
सर्वाधिक बळी | आदिल रशीद (६) | शदाब खान (५) | |||
मालिकावीर | लियाम लिविंगस्टोन (इंग्लंड) |
पाकिस्तान क्रिकेट संघाने तीन आंतरराष्ट्रीय एकदिवसीय सामने (वनडे) आणि तीन आंतरराष्ट्रीय ट्वेंटी२० सामने खेळण्यासाठी जुलै २०२१ दरम्यान इंग्लंडचा दौरा केला. आंतरराष्ट्रीय एकदिवसीय मालिका २०२०-२२ आयसीसी क्रिकेट विश्वचषक सुपर लीग अंतर्गत खेळविण्यात आली.
सुरुवातीस आयॉन मॉर्गनला पाकिस्तानविरुद्धच्या मालिकेसाठी इंग्लंडच्या कर्णधारपदी नेमण्यात आले होते परंतु इंग्लंडचे काही खेळाडू आणि संघ व्यवस्थापनेमधील काही कर्मचारी यांना कोरोनाची लागण झाल्याने मालिकेसाठी निवडलेला संपूर्ण संघ विलगीकरणात ठेवायला लागला. इंग्लंड आणि वेल्स क्रिकेट बोर्डाने उपकर्णधार बेन स्टोक्सच्या नेतृत्वात १५ जणांचा दुसरा संघ जाहीर केला. इंग्लंड बोर्डाने कोव्हिड संदर्भात घेतलेली काळजी यावर पाकिस्तान क्रिकेट बोर्डाने समाधान दर्शवले.
इंग्लंडने पहिले दोन एकदिवसीय सामने जिंकत मालिकाविजय निश्चित केला. तिसऱ्या सामन्यात देखील पाकिस्तानला ३ गडी राखून पराभव करत इंग्लंडने आंतरराष्ट्रीय एकदिवसीय मालिका ३-० अश्या फरकाने जिंकली. पाकिस्तानने ट्वेंटी२० मालिकेत बलाढ्य धावसंख्या उभारून इंग्लंडवर मात करत मालिकेत आघाडी घेतली. पहिल्या ट्वेंटी२० सामन्यात उभारलेली २३२ ही आंतरराष्ट्रीय ट्वेंटी२० मधील पाकिस्तानची सर्वोच्च धावसंख्या आहे. इंग्लंडने दुसरी ट्वेंटी२० ४५ धावांनी जिंकत मालिका १-१ अशी बरोबरीच्या स्थितीत आणून ठेवली. तिसऱ्या आणि अखेरच्या निर्णायक ट्वेंटी२० सामन्यात इंग्लंडने विजय मिळवत तीन सामन्यांची ट्वेंटी२० मालिका २-१ ने जिंकली.
२०२०-२२ आयसीसी क्रिकेट विश्वचषक सुपर लीग - आंतरराष्ट्रीय एकदिवसीय मालिका
१ला सामना
पाकिस्तान १४१ (३५.२ षटके) | वि | इंग्लंड १४२/१ (२१.५ षटके) |
- नाणेफेक : इंग्लंड, क्षेत्ररक्षण.
- ब्रायडन कार्स, झॅक क्रॉली, लुइस ग्रेगरी, फिल सॉल्ट, जॉन सिम्पसन (इं) आणि सौद शकील (पाक) या सर्वांनी आंतरराष्ट्रीय एकदिवसीय पदार्पण केले.
- विश्वचषक सुपर लीग गुण : इंग्लंड - १०, पाकिस्तान - ०.
२रा सामना
इंग्लंड २४७ (४५.२ षटके) | वि | पाकिस्तान १९५ (४१ षटके) |
सौद शकील ५६ (७७) लुइस ग्रेगरी ३/४४ (८ षटके) |
- नाणेफेक : पाकिस्तान, क्षेत्ररक्षण.
- पावसामुळे सामना प्रत्येकी ४७ षटकांचा करण्यात आला.
- विश्वचषक सुपर लीग गुण : इंग्लंड - १०, पाकिस्तान - ०.
३रा सामना
पाकिस्तान ३३१/९ (५० षटके) | वि | इंग्लंड ३३२/७ (४८ षटके) |
- नाणेफेक : इंग्लंड, क्षेत्ररक्षण.
- विश्वचषक सुपर लीग गुण : इंग्लंड - १०, पाकिस्तान - ०.
आंतरराष्ट्रीय ट्वेंटी२० मालिका
१ला सामना
पाकिस्तान २३२/६ (२० षटके) | वि | इंग्लंड २०१ (१९.२ षटके) |
- नाणेफेक : इंग्लंड, क्षेत्ररक्षण.
- आझम खान (पाक) याने आंतरराष्ट्रीय ट्वेंटी२० पदार्पण केले.
२रा सामना
इंग्लंड २०० (१९.५ षटके) | वि | पाकिस्तान १५५/९ (२० षटके) |
मोहम्मद रिझवान ३७ (२९) साकिब महमूद ३/३३ (४ षटके) |
- नाणेफेक : पाकिस्तान, क्षेत्ररक्षण.