पाइक्स पीक
पाइक्स पीक | |
---|---|
पाइक्स पीक | |
१४,११५ फूट (४,३०२ मीटर) | |
एल पासो काउंटी, कॉलोराडो, अमेरिका | |
पाइक्स पीक मासिफ | |
38°40′25″N 106°14′46″E / 38.67361°N 106.24611°E | |
बार ट्रेल, पाइक्स पीक कॉग रेल्वे, खाजगी वाहने |
पाइक्स पीक अमेरिकेतील रॉकी माउंटन्स पर्वतरांगेतील एक शिखर आहे. रॉकी माउंटन्सच्या इतर रांगांपेक्षा किंचित दूर असलेले हे शिखर पाइक्स पीक मासिफ या डोंगरावर आहे. कॉलोराडो स्प्रिंग्ज शहराजवळ असलेल्या या शिखराची उंची १४,२७६ फूट आहे. या शिखरापर्यंत चालत, रेल्वेगाडीने किंवा मोटारकारने जाता येते.
स्पॅनिश शोधकांनी याला सुरुवातीस एल कॅपितान असे नाव दिले होते. त्यानंतर झेब्युलॉन पाइकचे नाव या डोंगरास दिले गेले. या डोंगराला स्थानिक अरापाहो भाषेत हीय ओतोयू असे नाव आहे.[१]
संदर्भ
- ^ "अरापाहो स्थलनामे". अरापाहो भाषा आर्काइव्ह, युनिव्हर्सिटी ऑफ कॉलोराडो ॲट बोल्डर. 2015-09-23 रोजी मूळ पान पासून संग्रहित. २०१२-०७-१८ रोजी पाहिले.