पांढुर्णा
पांढुर्णा हा भारताच्या मध्यप्रदेश राज्यातील ५४ वा जिल्हा आहे. येथे पोळ्याच्या दुसऱ्या दिवशी, पारंपरिक गोटमार होते.
पांढुर्णा शहर हे व्यवसायाच्या दृष्टीने महत्त्वाचे शहर आहे. हे राष्ट्रीय महामार्ग -47 (एनएच-47) वर स्थित आहे. हे शहर 'जाम' नदीच्या काठावर वसलेले आहे. या नदीच्या काठावर दरवर्षी प्रसिद्ध गोटमार जत्रेचे आयोजन केले जाते.
गोटमार जत्रा
पांढुर्ण्याच्या युवकाचा सावरगावच्या युवतीशी असलेला प्रेमसंबंध या गोटमारीमागे आहे. या तरुणीला विवाहानंतर पांढुर्ण्याला नेत असतांना तेथील नागरिकांनी विरोध म्हणून गोटमार सुरू केली. या दरम्यान विवाहीत दोघांचा जांब नदीमध्ये पडून मृत्यु झाला. म्हणून आजतगायत ही परंपरा पाळण्यात येते.[१]
या गावाशेजारी असलेल्या सावरगाव व या गावामध्ये जांब नदी वाहते. त्या नदीत पहाटे एक पळसाचे झाड रोवण्यात येते. त्यास एक झेंडा बांधण्यात येतो. या दोन्ही गावातील लोक गोफणीने एकमेकांवर दगड भिरकवितात. ही दगडफेक होत असतांना,दोन्ही गावाचे लोक तो झेंडा काढून आणण्याचा प्रयत्न करतात. ज्याने झेंडा काढून आणला ते गाव जिंकले. असे न झाल्यास, सामोपचाराने झेंडा काढुन आणुन मग तो तेथील चंडी मातेच्या देवळात आणुन त्याची पूजा केली जाते.या गोटमारीमध्ये अनेक लोकं जखमी होतात. आजतागायत, या गोटमारीमुळे १२ व्यक्ति जखमी होउन मृत झाल्या आहेत.[१]
या गोटमारीदरम्यान अनेक लोक झेंडा काढण्यासाठी प्राणाची बाजी लावतात व दगड लागल्यामुळे जखमी होतात. यासाठी शासनाचा बंदोबस्त असतो. ही परंपरा गेली ३०० वर्षांहून अधिक काळ पाळली जात आहे.[२]
संदर्भ
- ^ a b "पांढुर्ण्याची गोटमार- लोकमत ई-पेपर नागपूर दि. ०७/०९/२०१३". 2013-10-23 रोजी मूळ पान पासून संग्रहित. 2013-09-07 रोजी पाहिले.
- ^ "गोटमार मेळावा माहिती" (इंग्रजी भाषेत).