पांढऱ्या भुवईचा बुलबुल
शास्त्रीय नाव | Pycnonotus luteolus |
---|---|
कुळ | वल्गुवदाद्य (Pycnonotidae) |
अन्य भाषांतील नावे | |
इंग्लिश | White-browed Bulbul |
संस्कृत | सितभ्रू गोवत्सक |
आकार
पांढऱ्या भुवईचा बुलबुल हा साधारण २० सें. मी. (८ इं) आकाराचा पक्षी आहे.
आवाज
शरिररचना
हा डोक्यावर तुरा नसलेला, फिकट हिरव्या रंगाचा पक्षी आहे. याचे कपाळ आणि भुवया पांढऱ्या असतात. भुवईच्या पांढऱ्या रंगावरून हे बुलबुल ओळखता येतात. नर आणि मादी दिसायला सारखेच असतात.
वास्तव्य
पांढऱ्या भुवईचा बुलबुल भारतीय द्वीपकल्पात सर्वत्र आढळणारा स्थानिक निवासी पक्षी आहे तसेच श्रीलंका देशातही याचे वास्तव्य आहे. हे बुलबुल झुडपी विरळ जंगलात, बागेत, शुष्क पानगळीच्या जंगलात राहतात.
प्रजाती
याच्या रंग आणि आकारावरून किमान २ उपजाती आहेत. भारतीय अपजातीच्या मानाने श्रीलंका येथील उपजात थोडी लहान आणि जास्त गडद असते.
खाद्य
विविध कीटक, फळे, दाणे, मध हे बुलबुलचे मुख्य खाद्य आहे. बुलबुल विविध प्रकारची फळे खाणारे पक्षी असल्याने झाडांच्या बिया दूर अंतरावर पसरविण्यास यांचा मोठा सहभाग आहे.
प्रजनन
मार्च ते सप्टेंबर हा कालावधी या बुलबुलचा विणीचा काळ असून जमिनीपासून २ मी. उंच झाडावर यांचे गवताचे, खोलगट घरटे असते. सहसा घरटे बांबूच्या रांजीत असते. मादी एकावेळी २-३ फिकट गुलाबी रंगाची त्यावर तपकिरी ठिपके असलेली अंडी देते. यांच्या अंड्यांवरील तपकिरी ठिपके लाल बुडाचा बुलबुलच्या अंड्यांवरील ठिपक्यांपेक्षा फिकट असतात. नर-मादी पिलांचे संगोपन करण्यापासून सर्व कामे मिळून करतात.