Jump to content

पांडुरंग गोविंदशास्त्री पारखी

पांडुरंग गोविंदशास्त्री पारखी उर्फ भावगुप्तपद्म (जन्म : कडूस - तालुका खेड - पुणे जिल्हा), २४ नोव्हेंबर १८४४; - पुणे, २९मार्च १९११)हे मराठीतील निबंधकार व कवी होते. पांडुरंग गोविंदशास्त्री पारखी ह्यांनी पुण्यातील पंडित बाळशास्त्री देव ह्यांच्या संस्कृत पाठशाळेत व्याकरण, व्युत्पत्ती, अलंकार इत्यादी विषयांचे अध्ययन केले होते.

त्यांची कालिदासाच्या ऋतुसंहारावर आधारित "षड्‌ऋतुवर्णन" ही रचना इ.स. १८८७साली पुस्तकरूपाने प्रकाशित झाली. त्यांनी विविध प्रकारच्या अन्योक्ती आणि काही काव्यकूटे भावगुप्तपद्म या नावाने लिहिली. पांडुरंग पारखींनी लिहिलेले निबंध, हे उपलब्ध ताम्रपट, शिलालेख, चिनी प्रवाशांचे ग्रंथ आदींचा अभ्यास करून ऐतिहासिक दृष्टीने लिहिले आहेत.

पांडुरंग गोविंदशास्त्रींची अन्य पुस्तके

  • अलंकारार्पण (काव्य. हे ’काव्यरत्नावली’मधून प्रसिद्ध झाले होते.
  • कादंबरीसार (बाणभट्टाच्या कादंबरीचे मराठी भाषांतर-१८९१)
  • कृष्णाकुमारी (काव्य-१८८४)
  • बाणभट्ट (निबंध-१९०५)
  • बोधामृत (काव्य-१८८४)
  • मंजुघोषा (कादंबरी)
  • मित्रचंद्र (कादंबरी-१९८०). या कादंबरीला दक्षिणा प्राइज कमिटीचा पुरस्कार मिळाला होता.
  • मुक्तामाला (कादंबरी)
  • श्रीकृष्णलीला (काव्य)
  • श्रीहर्ष (निबंध-१९११)
  • हंसिका (बाणभट्टाच्या कादंबरीतील एक कथा-१८६६)