Jump to content

पहिला तिम्मराज वोडेयार

पहिला तिम्मराज वोडेयार
मैसुरुचा तिसरा राजा
अधिकारकाळ१४५९-१४७८
अधिकारारोहण१४५९
राज्याभिषेक१४५९
राजधानीमैसुरु
जन्म१४३३
मृत्यू१४७८
मैसुरु
पूर्वाधिकारीपहिला चामराज वोडेयार
' दुसरा चामराज वोडेयार
उत्तराधिकारीदुसरा चामराज वोडेयार
वडीलपहिला चामराज वोडेयार
राजघराणेवडियार
धर्महिंदू

पहिला तिम्मराज वोडेयार पहिला (राजा अप्पाना थिम्मराजा, १४३३१४७८), हा म्हैसूर राज्याचा तिसरा राजा होता. १४५९ मध्ये त्याचे वडील पहिल्या चामराजाच्या मृत्यूनंतर वयाच्या २६ व्या वर्षी त्यांचा म्हैसूर राज्याचा तिसरा राजा म्हणून राज्याभिषेक झाला. याची सत्ता स्वतःच्या मृत्यूपर्यंत राहिली.

तिम्मराजने आपल्या वडील व आजोबांप्रमाणे आपले राज्य विजयनगर साम्राज्याला आधीन राहून केले. याचा सत्ताकालात मल्लिकार्जुन राय आणि दुसरा विरुपाक्ष राय हे सम्राट होते.

तिम्मराजाच्या सत्ताकालात उत्तर भारत मुघलांनी काबीज केला होता तर मध्य भारतातील दख्खनी सुलतानांनी दक्षिणेकडे पाय पसरविण्यास सुरुवात केली होते. बहमनी सल्तनतच्या दुसऱ्या मुहम्मद शाह बहमनीने थेट विजयनगरवर हल्ले केले होते तसेच ओडिशाचा कलिंग राजा पुरुषोत्तम गजपती कपिलेंद्र याच्या राज्याचे लचकेही तोडले होते.

इकडे पूर्वेस पोर्तुगीजांनी भारतात बस्तान बसविणे सुरू केले होते व त्यांनी विरुपाक्षाकडून भारताच्या पूर्व किनाऱ्यावरील अनेक बंदरे हिसकावून घेतली. या गोंधळातही तिम्मराज विजयनगरला धार्जिणा राहिला व आपले राज्य हळूहळू आसपासच्या प्रदेशात वाढविणे सुरू ठेवले.


पहिल्या तिम्मराजानंतर तर त्याचा मुलगा दुसरा चामराज सत्तेवर आला.