Jump to content

पहिला कुमारगुप्त

कुमारगुप्त पहिला याची मोहोर

कुमारगुप्त (इस. ४१४ ते ४५५) हा गुप्त साम्राज्याचा राज्यकर्ता सम्राट चंद्रगुप्त विक्रमादित्य याचा वारसदार होता व एक सक्षम राज्यकर्ता देखील. याने परंपरागत मिळालेले गुप्त साम्राज्य टिकवून ठेवण्यात मोठा वाटा उचलला.

दिल्ली येथील लोहस्तंभावरील कुमारगुप्त पहिला याचा लेख

कुमारगुप्त याने दिल्ली येथे उभारलेला लोहस्तंभ १७०० वर्षांनंतरही शाबूत आहे. व त्यावर कुमारगुप्तचा लेख आहे. हा लोहस्तंभ धातुशास्त्र या शास्त्रातील एक आश्चर्य मानले जाते. हा स्तंभ सुरुवातीला एका देवळाचा भाग होता व त्यावर गरुड मुद्रा होती. आज देवळाचा फक्त स्तंभ सोडल्यास कोणतेही अवशेष शिल्लक नाहीत व इस्लामी आक्रमणानंतर याला मशीदीत समावण्यात आले. असे मानतात की हा स्तंभ इस्लामी तोफखानाच्या माराही सहन करून आजही शाबूत उभा आहे.