पश्चिम रेल्वे क्षेत्र
पश्चिम रेल्वे हे भारतीय रेल्वेच्या १७ क्षेत्रांपैकी एक क्षेत्र आहे. १९५२ साली स्थापन झालेल्या पश्चिम रेल्वेचे मुख्यालय मुंबईच्या चर्चगेट रेल्वे स्थानक येथे असून महाराष्ट्र, गुजरात, राजस्थान व मध्य प्रदेश ही राज्ये पश्चिम रेल्वेच्या अखत्यारीत येतात. वडोदरा रेल्वे स्थानक हे पश्चिम रेल्वेवरील सर्वात वर्दळीचे जंक्शन आहे.
मुंबईमध्ये मुंबई सेंट्रल व वांद्रे टर्मिनस ह्या स्थानकांवरून बहुतेक सर्व लांब पल्ल्याच्या गाड्या सुटतात. मुंबई उपनगरी रेल्वेचा पश्चिम मार्ग पश्चिम रेल्वेद्वारे चालवला जातो.
विभाग
पश्चिम रेल्वेचे सहा विभाग आहेत.