Jump to content

पश्चिम बंगालचे मुख्यमंत्री

ममता बॅनर्जी मे २०११ पासून पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्रीपदावर आहेत.

पश्चिम बंगालचा मुख्यमंत्री हा भारताच्या पश्चिम बंगाल राज्याचा सरकारप्रमुख आहे. भारतीय संविधानानुसार राज्यप्रमुख जरी राज्यपाल असला तरी राज्याची सर्व सुत्रे व निर्णयक्षमता मुख्यमंत्र्याच्या व त्याच्या मंत्रीमंडळाच्या हातात असते. पश्चिम बंगाल विधानसभा निवडणुकीमध्ये सर्वाधिक जागा मिळवणाऱ्या राजकीय पक्षाला राज्यपाल सरकारस्थापनेसाठी आमंत्रित करतो. त्या पक्षाच्या विधिमंडळ समितीद्वारे मुख्यमंत्र्याची निवड केली जाते. बहुमत सिद्ध करून मुख्यमंत्री आपल्या पदावर पाच वर्षे राहू शकतो.

१९४६ सालापासून आजवर केवळ ८ व्यक्ती पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्रीपदावर राहिल्या आहेत. १९७७ ते २००० ह्या २३ वर्षांच्या कालावधीमध्ये मुख्यमंत्री राहिलेले मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाचे ज्योती बसू हे आजवरचे भारतामधील सर्वाधिक काळ मुख्यमंत्रीपदावर असलेले नेते आहेत.

यादी

क्रम नाव पदग्रहण[][]पद सोडले कार्यकाळ पक्ष[]
(आघाडी)
1 प्रफुल्लचंद्र घोष 15 ऑगस्ट 1947 22 जानेवारी 1948 160 दिवस भारतीय राष्ट्रीय काँग्रेस
2 बिधन चंद्र रॉय23 जानेवारी 1948 1 जुलै 1962 &0000000000000014.000000१४ वर्षे, &0000000000000159.000000१५९ दिवस
3 प्रफुल्लचंद्र सेन[a]1 जुलै 1962 28 फेब्रुवारी 1967 &0000000000000004.000000४ वर्षे, &0000000000000242.000000२४२ दिवस
4 अजय मुखर्जी1 मार्च 21 नोव्हेंबर 1967 265 दिवस बांगला काँग्रेस
(संयुक्त आघाडी)
(1) प्रफुल्लचंद्र घोष 21 नोव्हेंबर 1967 19 फेब्रुवारी 1968 90 दिवस अपक्ष
पद रिकामे[b]
(राष्ट्रपती राजवट)
20 फेब्रुवारी 1968 25 फेब्रुवारी 1969 &0000000000000001.000000१ वर्ष, &0000000000000005.000000५ दिवस
(4) अजय मुखर्जी25 फेब्रुवारी 1969 30 जुलै 1970 &0000000000000001.000000१ वर्ष, &0000000000000155.000000१५५ दिवस बांगला काँग्रेस
(संयुक्त आघाडी)
पद रिकामे[b]
(राष्ट्रपती राजवट)
30 जुलै 1970 2 मार्च 1971 215 दिवस
(1) प्रफुल्लचंद्र घोष 2 एप्रिल 25 जून 1971 84 दिवस
(एकूण: 2 वर्षे, 139 दिवस)
भारतीय राष्ट्रीय काँग्रेस
पद रिकामे[b]
(राष्ट्रपती राजवट)
25 जून 1971 19 मार्च 1972 268 दिवस
5 सिद्धार्थ शंकर रे 20 मार्च 1972 30 एप्रिल 1977 &0000000000000005.000000५ वर्षे, &0000000000000041.000000४१ दिवस भारतीय राष्ट्रीय काँग्रेस
पद रिकामे[b]
(राष्ट्रपती राजवट)
30 एप्रिल 1977 20 जून 1977 51 दिवस
6 ज्योती बसू21 जून 1977 23 मे 1982 &0000000000000023.000000२३ वर्षे, &0000000000000137.000000१३७ दिवस भारतीय कम्युनिस्ट पक्ष (मार्क्सवादी)
(डावी आघाडी)
24 मे 1982 29 मार्च 1987
30 मार्च 1987 18 जून 1991
19 जून 1991 15 मे 1996
16 मे 1996 5 नोव्हेंबर 2000
7 बुद्धदेव भट्टाचार्य6 नोव्हेंबर 2000 14 मे 2001 &0000000000000010.000000१० वर्षे, &0000000000000188.000000१८८ दिवस
15 मे 2001 17 मे 2006
18 मे 2006 13 मे 2011
8 ममता बॅनर्जी20 मे 2011 विद्यमान&0000000000000013.000000१३ वर्षे, &0000000000000109.000000१०९ दिवस अखिल भारतीय तृणमूल काँग्रेस

टीपा

  1. ^ १ ते ८ जुलै १९६२ दरम्यान सेन बंगालचे कार्यवाहू मुख्यमंत्री होते. त्यांनी ९ जुलै १९६२ रोजी पदाची शपथ घेतली.
  2. ^ a b c d राज्यामध्ये राष्ट्रपती राजवट लागू असताना राज्यमंत्रीमंडळ बरखास्त केले जाते. म्हणून मुख्यमंत्र्याचे पद रिकामे राहते. राज्याचे कामकाज केंद्र सरकारच्या सल्ल्याने राज्यपालाद्वारे सांभाळले जाते. काही वेळा विधानसभा देखील बरखास्त केली जाऊ शकते.[]

संदर्भ

  1. ^ List of Chief Ministers of West Bengal (pdf). पश्चिम बंगाल सरकार. 12 जून 2014 रोजी पाहिले.
  2. ^ Premiers/Chief Ministers of West Bengal. West Bengal Legislative Assembly. 12 जून 2014 रोजी पाहिले.
  3. ^ Origin and Growth of the West Bengal Legislature. पश्चिम बंगाल विधानसभा. 12 जून 2014 रोजी पाहिले.
  4. ^ अंबरीष दिवाणजी. "राष्ट्रपती राजवटीवरील माहिती". Rediff.com. 15 मार्च 2005.