पश्चिम द्रुतगती महामार्ग
पश्चिम द्रुतगती महामार्ग | |
---|---|
वांद्र्याजवळ पश्चिम द्रुतगती महामार्ग | |
मार्ग वर्णन | |
देश | भारत |
लांबी | २५.३३ किलोमीटर (१५.७४ मैल) |
सुरुवात | दहिसर |
प्रमुख जोडरस्ते | घोडबंदर रोड, जोगेश्वरी–विक्रोळी जोडरस्ता, सांताक्रूझ–चेंबूर जोडरस्ता, वांद्रे-वरळी सागरी महामार्ग |
शेवट | वांद्रे |
स्थान | |
शहरे | मुंबई |
राज्ये | महाराष्ट्र |
पश्चिम द्रुतगती महामार्ग (Western Express Highway) हा राष्ट्रीय महामार्ग ८चा मुंबई महानगर क्षेत्रामधील भाग व मुंबई शहरामधील पश्चिम उपनगरांमधून धावणारा एक महत्त्वाचा रस्ता आहे. २३.५५ किमी लांबीचा हा दृतगतीमार्ग उत्तर-दक्षिण धावतो. हा महामार्ग मुंबईच्या दहिसर, बोरिवली, कांदिवली, मालाड, गोरेगाव, जोगेश्वरी, अंधेरी, विले पार्ले, सांताक्रूझ, वांद्रे इत्यादी अनेक महत्त्वाच्या उपनगरांना जोडतो. अत्यंत वर्दळीच्या ह्या मार्गावर वाहतूक सुधारण्यासाठी अनेक उड्डाणपूल बांधले गेले आहेत. २०१४ साली ह्या महामार्गावरून छत्रपती शिवाजी आंतरराष्ट्रीय विमानतळाकडे जलद वाहतूकीसाठी २.२ किमी लांबीचा सहार उन्नत मार्ग बांधण्यात आला.
मुंबई मेट्रोच्या मार्ग १ वरील पश्चिम द्रुतगती महामार्ग मेट्रो स्थानक अंधेरी-कुर्ला रस्त्यावर महामार्गाच्या जवळच बांधण्यात आले आहे.
हे सुद्धा पहा
साचा:मुंबईमधील रस्ते