पश्चिमोत्तानासन
पश्चिमोत्तानासन हे एक योगासन आहे. 'पश्चिम' या शब्दाचा एक अर्थ 'पाठीमागची बाजू' असाही होतो. या आसनात मानेपासून पायांच्या घोट्यापर्यंतच्या सर्व पाठीमागच्या शरीराच्या भागास ताण मिळतो म्हणून याला पश्चिमोत्तानासन म्हणतात.
कृती
- दोन्ही पाय समोर उघडून बसावे. पायांचे अंगठे व टाचा जुळवून ठेवावे. दोन्ही हात कंबरेच्या दोन्ही बाजूस ठेवावे. दोन्ही हात कंबरेच्या दोन्ही बाजूस ठेवावे. मान सरळ व नजर समोर असावी.
- थोडे समोर वाकून हनुवटी जमिनीला समांतर ठेवून कंबरेतून वाकून डाव्या हाताने डाव्या हाताचा अंगठा पकडावा. व उजव्या हाताने उजव्या हाताचा अंगठा पकडावा.
- श्वास सोडत आणखी पुढे वाकून कपाळ गुडघ्यावर वाकवू नये किंवा गुडघे वर उचलून कपाळ गुडघ्याला लावू नये किंवा हिसके देऊन कपाळ गुडघ्यास लावण्याचा प्रयत्न करू नये. अंगठे पकडता आले नाहीत तर घोटे पकडून शक्य तेवढे पुढे वाकावे. कोपरे जमिनीवर टेकवण्याचा प्रयत्न करावा. संथ श्वास चालू ठेवावा.
- थोडा वेळ त्याच स्थितीत राहावे.
- हळू हळू हाताची पकड सोडून पूर्वस्थितीत यावे.
फायदे
- पचनसंस्था कार्यक्षम होते.
- पोटर्यापासून मानेपर्यंतच्या मागील (पश्चिम) भागाच्या स्नायूंना ताण बसतो.
- दक्षता - स्पॉंडिलेसिसच्या रुग्णांनी डॉक्टरांच्या सल्ल्याशिवाय हे आसन करू नये.