पवित्र वनस्पती
हिंदू धर्माने अनेक वनस्पतींना पवित्र मानले आहे. विविध देवतांच्या पूजेसाठी या वनस्पतींचा वापर करतात. यांतल्या बहुतेक वनस्पती ही आयुर्वेदिक औषधे आहेत.
पवित्र वनस्पती
- अगरू या वनस्पतीचा वापर सुगंधी द्रव्य म्हणून होतो.
- अघाडा : मंगळागौरीच्या पूजेच्या वेळेस याचा वापर होतो.
- केना : मंगळागौरीच्या पूजेच्या वेळेस याचा वापर होतो.
- चंदन या वनस्पतीचे वाळलेले खोड उगाळून देवाला गंध लावतात.
- तुळस ही वनस्पती विष्णूला प्रिय आहे.
- दुर्वा ही वनस्पती गणपतीला प्रिय आहे.
- कांटेधोत्रा या वनस्पतीचे फळ शिवाला प्रिय आहे.
- बेल या वनस्पतीची पाने शिवाला प्रिय आहे.
- शमी या वनस्पतीची पानेगणपतीला प्रिय आहे.
पुस्तके
- भारतातील पवित्र वनस्पती (मूळ इंग्रजी लेखक - नंदिता कृष्ण आणि एम. अमिर्तलिंगम; मराठी अनुवाद - वर्षा गजेंद्रगडकर)