पवित्र रोमन साम्राज्य
पवित्र रोमन साम्राज्य Holy Roman Empire Imperium Romanum Sacrum Heiliges Römisches Reich Sacro Romano Impero | ||||
| ||||
| ||||
राजधानी | नाही | |||
अधिकृत भाषा | लॅटिन, जर्मेनिक, स्लाव्हिक | |||
आजच्या देशांचे भाग | ऑस्ट्रिया बेल्जियम क्रोएशिया चेक प्रजासत्ताक फ्रान्स जर्मनी इटली लिश्टनस्टाइन लक्झेंबर्ग नेदरलँड्स पोलंड स्लोव्हेनिया स्वित्झर्लंड |
पवित्र रोमन साम्राज्य हे मध्य युरोपमधील राज्य/देशांना एकत्रित केलेले राष्ट्र होते. त्याची रचना इ.स. ८४३मध्ये त्यावेळच्या फ्रॅंकिश साम्राज्याचा पूर्वेकडील भागातून व्हर्दुनच्या तहात झाली.
या साम्राज्यात आत्ताच्या जर्मनीचा बराचसा भाग, चेक प्रजासत्ताक, ऑस्ट्रिया, लिच्टेन्स्टेन, स्लोव्हेनिया, बेल्जियम, लक्झेम्बर्ग, पोलंडचा बराचसा भाग व नेदरलँड्सचा काही भाग यांचा समावेश होता. काही काळासाठी यात स्वित्झरलंड, सगळे नेदरलँड्स आणि फ्रान्स व इटलीचेही काही भाग समाविष्ट होते.
याच्या राज्यकर्त्यांना पवित्र रोमन सम्राट ही पदवी होती. जवळजवळ १,००० वर्षांच्या अस्तित्वानंतर इ.स. १८०६मध्ये याचे विभाजन झाले. अठराव्या शतकात या साम्राज्याच्या पडतीच्या काळात व्होल्तेरने थट्टेने म्हणले होते की पवित्र रोमन साम्राज्य हे आता पवित्र नाही, रोमन नाही व साम्राज्य तर मुळीच नाही.