Jump to content

पळसदेव

पळसदेव हे पुणे जिल्ह्यातील गाव आहे. जुने पळसदेव गाव उजनी धरण जलाशयात बुडाल्यामुळे नव्याने वसवलेले हे भीमा नदीकाठी असलेले गाव आहे.[ दुजोरा हवा] पुण्यापासून पळसदेव गाव १२० किमी.वर आहे.

खुप जुने व प्राचीन शिव मंदिर आहे इतिहासात त्याचे उलेख आहे प्रति काशी विश्वदेव त्याचे महत्त्व आहे

हवामान

येथील सर्वसाधारण हवामान उष्ण व कोरडे आहे. हवामानातील बदलानुसार प्रत्येक वर्षात मुख्यतः तीन ऋतू असतात.मार्च ते मे पर्यंत उन्हाळा, जून ते ऑक्टोबर पर्यंत पावसाळा आणि नोव्हेंबर ते फेब्रुवारी पर्यंत हिवाळा असतो. तालुक्यातील वार्षिक सरासरी पर्जन्यमान ४६० मिमी पर्यंत असते.

इतिहास

धरणात बुडालेले गेलेले गाव

मंदिरे

उन्हाळ्यात धरणाचे पाणी आटले की पाण्याखाली बुडालेले पळसदेवाचे मंदिर दिसू लागते. पुणे-सोलापूर रस्त्यावर भिगवण हे प्रसिद्ध गाव आहे. या गावापासून काही अंतरावर पळसदेव गावाचा फाटा फुटतो. गावातून गेलेला तो रस्ता थेट पुढे कच्चा होत थेट उजनी नदीच्या पात्रात पोहोचतो. एका छोट्याशा होडीप्रवासाने पाण्यातून वर आलेल्या पळदेवाच्या मंदिरापर्यंत पोहोचता येते. या मंदिराशेजारी आणखी एक मंदिर आहे, पण कोणत्या देवाचे ते समजत नाही. समोरच्या टेकाडावर एक रिता गाभारा असलेले मंदिर आहे. या मंदिराभोवती कातळी भिंतींवर रामायण कोरले आहे.

पळसदेवाचे मंदिर

हे मंदिर यादवकालीन असावे. त्याच्या पक्क्या विटांनी बांधलेली शिखरे आजही टिकून आहेत. मंदिर आवारात सतीशिळा, वीरगळ, (भंगलेला) घोडा, मारुतीची मूर्ती, दीपमाळेचे अवशेष्भक्कम विटांची भग्न ओवरी असे अनेक अवशेष पाणी ओसरले की पाहता येतात. मंदिरासमोरची विटांची ओवरी ही फलटणकर निंबाळकरांनी बांधली असे सांगितले जाते. मूळ मंदिरातील काही मूर्ती नव्याने बांधलेल्या मंदिरात ठेवल्या आहेत.

शिलालेख

हे सुद्धा पहा