पर्वती ही महाराष्ट्रातीलपुणे शहराच्या आग्नेय दिशेस उभी असलेली टेकडी आहे. पर्वताई देवीच्या नावावरून टेकडीस पर्वती हे नाव पडले, पुण्याच्या अनेक भागांतून ती दृष्टीस पडते. हिच्या माथ्याची समुद्रसपाटीपासूनची उंची सुमारे ६४० मीटर (२१०० फूट) आहे. सुमारे १०३ पायऱ्या चढून येथे पोहोचता येते.[१] या पायऱ्या भव्य अशा नौबतखान्याजवळ संपतात.हिच्या माथ्यावर देवदेवेश्वर मंदिर व अन्य काही देवदेवतांची मंदिरे आहेत. मराठा साम्राज्याचे पंतप्रधान असलेल्या नानासाहेब पेशवे यांनी तावरे पाटील यांच्या कडून जमीन घेऊन देवदेवेश्वर मंदिर बांधवून घेतले. २३ एप्रिल, इ.स. १७४९ रोजी हे मंदिर उभे राहिले [२].[३] टेकडीवर नानासाहेब पेशव्यांचे स्मारक ,पेशवे संग्रहालय, पायथ्याला प्राचीन लेणी आहेत.
मुख्य मंदिर आणि अन्य मंदिरे
पर्वतीवर देवदेवेश्वराच्या मुख्य मंदिराशिवाय कार्तिकेय, विष्णू, विठ्ठल-रुक्मिणी इत्यादी दैवतांची मंदिरे आहेत. यांपैकी कार्तिकस्वामी मंदिर, श्रीविष्णू मंदिर, होमशाळा इत्यादी इमारती देवदेवेश्वर मंदिरानंतरच्या काळात बांधल्या गेल्या. पानिपताच्या तिसऱ्या लढाईतील मराठ्यांच्या प्रचंड हानीमुळे खचून गेलेल्या नानासाहेब पेशव्यांचे प्राणोत्क्रमण जून, इ.स. १७६१ मध्ये येथील होमशाळेत झाले[२].मुख्य मंदिर आधुनिक हिंदू शैलीत बांधलेले आहे. त्याचा कळस उंच व निमुळता असून त्यावर सोन्याचा मुलामा दिला आहे. मंदिर परिसरातील चौकोनी बैठकीच्या चार कोपऱ्यात चार लहान मंदिरे आहेत ती सूर्यदेव (आग्नेय), गणेश (नैर्ऋत्य), अंबाबाई (वायव्य) आणि विष्णू (ईशान्य) यांना समर्पित आहेत. इस १७६६ मध्ये माधवराव पेशव्यांनी ज्याच्यात चार लहान मंदिरे आणि एक मुख्य मंदिर यांचा समावेश होतो, असे हे शिव पंचायतन विकसित केले. मंदिरात भगवान शंकर, पार्वती आणि गणेश यांच्या धातूच्या मूर्ती आहेत. त्या तीन मूर्ती १७४९ मध्ये मुळात सोन्याच्या बनवलेल्या होत्या; १९३२ मध्ये त्या चोरीला गेल्या व त्याजागी त्याच्या हुबेहूब दुसऱ्या अन्य धातूच्या मूर्ती ठेवल्या गेल्या. मुख्य मंदिराच्या पश्चिमेला भगवान कार्तिक स्वामींचे मंदिर आहे. तिथे महिलांना प्रवेश वर्ज्य आहे.
राजा दिनकर केळकर वस्तु संग्रहालय · महात्मा फुले वस्तु संग्रहालय · बाबासाहेब आंबेडकर वस्तु संग्रहालय · पुणे आदिवासी वस्तु संग्रहालय · राष्ट्रीय युद्धवस्तु संग्रहालय
उद्याने आणि प्राणी संग्रहालये
बंड गार्डन · राजीव गांधी उद्यान · शामाप्रसाद मुखर्जी उद्यान · शाहू उद्यान · पेशवे पार्क · सारस बाग · एम्प्रेस गार्डन · कमला नेहरू पार्क ·संभाजी पार्क· थोरात पार्क · ताथवडे उद्यान · नाना-नानी पार्क · पु.ल. देशपांडे उद्यान
दवाखाने
आदित्य बिर्ला मेमोरिअल हॉस्पिटल, पुणे ·अष्टांग आयुर्वेद हॉस्पिटल व पंचकर्म पुणे· औंध चेस्ट हॉस्पिटल, पुणे · बोरा हॉस्पिटल, पुणे · चितळे ई एन टी हॉस्पिटल, पुणे · डी वाय पाटील हॉस्पिटल अँड रिसर्च सेंटर, पुणे · दीनानाथ मंगेशकर हॉस्पिटल, पुणे · देवधर आय हॉस्पिटल, पुणे · गोडबोले हॉस्पिटल, पुणे · गुप्ते हॉस्पिटल, पुणे · हर्डीकर हॉस्पिटल, पुणे · इन्लॅक अँड बुधरानी हॉस्पिटल, पुणे · जालन्स हेंल्थ केअर अँड डायबेटिस केअर सेंटर, पुणे · जहांगीर हॉस्पिटल, पुणे · जोग हॉस्पिटल, पुणे · जोशी क्लिनिक, पुणे · के ई एम हॉस्पिटल रिसर्च सेंटर, पुणे · कमला नेहरू हॉस्पिटल, पुणे · कर्णे हॉस्पिटल, पुणे · केअरिंग हॉस्पिटल, पुणे · कृष्णा हॉस्पिटल, पुणे · लोकमान्य केअर हॉस्पिटल, पुणे · मेडिपॉइंट हॉस्पिटल, पुणे · नायडू हॉस्पिटल, पुणे · नाईक हॉस्पिटल, पुणे · एन् एम् वाडिया हॉस्पिटल, पुणे · नोबेल हॉस्पिटल, पुणे · पूना हॉस्पिटल, पुणे · रत्ना मेमोरियल हॉस्पिटल, पुणे ·रुबी हॉल क्लिनिक, पुणे· सह्याद्री हॉस्पिटल, पुणे · साईस्नेह हॉस्पिटल, पुणे · समर्थ हॉस्पिटल, पुणे · संचेती हॉस्पिटल, पुणे · संजीवन हॉस्पिटल, पुणे · ससून जनरल हॉस्पिटल, पुणे · श्री हॉस्पिटल, पुणे · सुरज हॉस्पिटल, पुणे · सूर्या हॉस्पिटल, पुणे ·सूर्यप्रभा नर्सिंग होम, पुणे