पर्पल पॉपी
पर्पल पॉपी हे युनायटेड किंग्डममध्ये युद्धकाळात कार्यरत असलेल्या किंवा कामी आलेल्या प्राण्यांच्या स्मरणार्थ तयार करण्यात आलेले एक प्रतीकचिन्ह आहे[१]. हे चिन्ह स्मृती-दिवसासाठी तयार करण्यात आले होते. यासाठी पारंपारिक लाल स्मरब्रन्स पॉपीचा वापर केला होता. २००६ मध्ये हे चिन्ह तयार करण्यात आले. [१]
विशेषतः, त्या काळात लष्करी सेवेमध्ये कुत्रे कार्यरत होते. उदा. युनायटेड किंग्डम मधील "फर्स्ट मिल्ट्री वर्किंग डॉग रेजिमेंट".यातील कुत्र्यांनी पहिल्या महायुद्धात काम केले होते. कुत्र्यांप्रमाणेच ईतर अनेक प्राणी जसे की घोडे आणि गाढवे सुद्धा वापरण्यात आली होती.
पार्श्वभूमी
२००६ मध्ये 'ॲनीमल एड' या धर्मादाय संस्थेने,पर्पल पॉपी हे चिन्ह युद्धात कामी आलेल्या प्राण्यांच्या स्मरणार्थ तयार केले होते. [१] या चिन्हाचा वापर मदत मागण्यासाठी सुद्धा करण्यात येतो. प्रथम विश्वयुद्धादरम्यान अंदाजे आठ दशलक्ष घोडे आणि गाढवे मरण पावली होती. [२]हे चिन्ह लाल किंवा पांढऱ्या रंगाच्या कपड्यांसोबत घालण्यासाठी तयार केले गेले होते[१]. ॲनिमल एडने २०१५ पर्यंत पर्पल पॉपीची विक्री केली होती.त्याची चुकीची व्याख्या करण्यात आली होती असे जेव्हा त्यांना वाटले तेंव्हा त्यांनी हे चिन्ह एनॅमलच्या जांभळ्या चिन्हात बदलविले होते.असे समजण्यात आले होते की प्राणी "नायक" नाहीत तर पीडित/बळी आहेत.[३][४] त्यानंतर पर्पल पॉपी हे प्रतीक म्हणून मर्फीच्या आर्मी चॅरिटीने २०१६ मध्ये त्याला घेतले आणि त्याद्वारे विक्री करणे सुरू ठेवले.[५][६]
११ नोव्हेंबर हा स्मृती-दिवसाव्यतिरिक्त, एक पर्पल पॉपी दिवसपण आहे. त्या दिवशी पर्पल पॉपीचा वेष परिधान केला जातो.
संदर्भ
- ^ a b c d McClean, James. "Remembrance poppy: Controversies and how to wear it". BBC. 2018-10-31 रोजी पाहिले.
- ^ "Poppy Appeal: White, gold and purple poppy meanings and where to get them for Remembrance Day 2018". Evening Standard. 2018-10-25. 2018-10-31 रोजी पाहिले.
- ^ Tyler, Andrew. "Purple poppy". Animals Aid. 2018-11-06 रोजी मूळ पान पासून संग्रहित. November 6, 2018 रोजी पाहिले.
- ^ "What is the purple poppy appeal and where can I buy one?". Metro. 2018-10-25. 2018-10-31 रोजी पाहिले.
- ^ "What is a purple poppy and where can you buy one for Remembrance Day?". Manchester Evening News. 2018-10-31 रोजी पाहिले.
- ^ "Purple poppies: lest we forget animals harmed in conflict". Smallholder. 2017-11-12. 2018-10-31 रोजी पाहिले.