पर्ट्यूसिस लस
पर्ट्यूसिस लस ही लस ही डांग्या खोकल्यापासून (पर्ट्यूसिस) संरक्षण करते.[१] दोन मुख्य प्रकार आहेत: संपूर्ण पेशीच्या लसी आणि पेशी नसलेल्या लसी. संपूर्ण पेशी लस सुमारे 78% प्रभावी आहे तर पेशी नसलेली लस 71-85% प्रभावी आहे.[२] लसीकरणानंतर लसींची परिणामकारकता दर वर्षी 2 ते 10% पर्यंत कमी झाल्याचे दिसून येते तसेच संपूर्ण पेशी लसींद्वारे ती अधिक झपाट्याने कमी झाल्याचे दिसून येते. गर्भधारणेदरम्यान आईचे लसीकरण केल्यास बाळाचे संरक्षण होऊ शकते. 2002 मध्ये या लसीमुळे 500,000हून अधिक जीव वाचले असा अंदाज आहे.[३]
वर्ल्ड हेल्थ ऑर्गनायझेशन आणि सेंटर फॉर डिसीज कंट्रोल अँड प्रिव्हेंशन यांनी सर्व मुलांना पर्ट्यूसिसची लस देण्याची आणि त्यास नियमित लसींमध्ये समाविष्ट केले जाण्याची शिफारस केली आहे.[१][४] यात एचआयव्ही / एड्स असणाऱ्या लोकांचा समावेश आहे. वयाच्या सहा आठवड्यापासून सुरू होणाऱ्या तीन डोसची शिफारस विशेषतः लहान मुलांमध्ये केली आहे. मोठ्या मुलांना आणि प्रौढांना अतिरिक्त डोस दिले जाऊ शकतात. लस केवळ धनुर्वात आणि घटसर्प यासाठीच्या लसींच्या संयोजनात उपलब्ध आहे.[१]
काही प्रतिकूल परिणामांमुळे विकसित जगात पेशी नसलेल्या लसी अधिक सामान्यपणे वापरल्या जातात. संपूर्ण पेशी लस दिलेल्या 10 ते 50% लोकांमध्ये इंजेक्शनच्या जागेवर लालसरपणा येतो किंवा ताप येतो. 1% पेक्षा कमी लोकांमध्ये तापामुळे येणारे फेफरे आणि दीर्घकाळ रडणे उद्भवते. पेशी नसलेल्या लसींमुळे अगदी काही काळ हाताला गंभीर नसलेल्या स्वरूपाची सूज येऊ शकते. दोन्ही प्रकारच्या लसींचे, परंतु विशेषतः संपूर्ण पेशी लसीचे, लहान मुलांमध्ये कमी आनुषंगिक परिणाम असतात. वयाच्या सात वर्षानंतर संपूर्ण पेशी लसी वापरू नयेत. गंभीर दीर्घकालीन न्यूरोलॉजिकल समस्या कोणत्याही प्रकाराशी संबंधित नसतात.[१]
पर्ट्यूसिस लस 1926 मध्ये विकसित केली गेली.[५] ही जागतिक आरोग्य संघटनेच्या अत्यावश्यक औषधांच्या सूचीमध्ये आहे, जी आरोग्य यंत्रणेत आवश्यक असलेले सर्वात प्रभावी आणि सुरक्षित असे औषध आहे.[६] एक आवृत्ती, ज्यामध्ये धनुर्वात, घटसर्प, पोलिओ, आणि Hib लस यांचा देखील समावेश आहे ती विकसनशील जगतामध्ये 2014 पर्यंत प्रत्येक डोसासाठी 15.41 अमेरिकन डॉलर इतक्या किमतीत घाऊक प्रमाणात उपलब्ध आहे.[७]
संदर्भ
- ^ a b c d "Pertussis vaccines: WHO position paper - September 2015" (PDF). Wkly Epidemiol Rec. 90 (35): 433-58. 2015 Aug. PMID 26320265.
- ^ Zhang, L; Prietsch, SO; Axelsson, I; Halperin, SA (Sep 17, 2014). "Acellular vaccines for preventing whooping cough in children". The Cochrane Database of Systematic Reviews. 9: CD001478. doi:10.1002/14651858.CD001478.pub6. PMID 25228233.
- ^ "Pertussis: Summary of Vaccine Recommendations". Centre for Disease Control and Prevention. Retrieved 12 Dec 2015.
- ^ Macera, Caroline (2012). Introduction to Epidemiology: Distribution and Determinants of Disease. Nelson Education. p. 251. ISBN 9781285687148.
- ^ "WHO Model List of EssentialMedicines" (PDF). World Health Organization. October 2013. Retrieved 22 April 2014.
- ^ "WHO Model List of EssentialMedicines" (PDF). World Health Organization. October 2013. Retrieved 22 April 2014.
- ^ "Vaccine, Pentavalent Archived 2020-01-25 at the Wayback Machine.". International Drug Price Indicator Guide. Retrieved 8 December 2015.