Jump to content

परावर्तन

θi = θr
परावर्तन नियम दर्शवणारी आकृती

परावर्तन (इंग्लिश : Reflection) म्हणजे दोन माध्यमांच्या सीमेवरील पृष्ठाशी तरंगमुखाच्या दिशेत घडलेला बदल, ज्यात एका माध्यमातून आलेले तरंगमुख त्या पृष्ठावरून त्याच माध्यमात, परंतु वेगळ्या दिशेत, माघारी फिरते. परिचित उदाहरणे म्हणजे प्रकाश, ध्वनी व पाण्यावरील तरंग इत्यादींचे परावर्तन. परावर्तन नियमाप्रमाणे आयात तरंगाचा पृष्ठाशी असलेला कोन, म्हणजेच आयात कोन, परावर्तित तरंगाने पृष्ठाशी केलेल्या कोनाशी, म्हणजेच परावर्तन कोनाशी समान असतो.